रावसाहेब दानवेंनी घेतला इंग्रजीचा धसका

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 जून 2019

पिंपरी : `सेटलमेंट` हा इंग्रजी शब्द बोलल्याने त्याचा चुकीचा अर्थ काढून अर्जून खोतकर व माझ्याविषयी चुकीच्या बातम्या पसरविल्या. त्यामुळे इंग्रजी शब्द यावेळी बोलणार नाही. नाहीतर पुन्हा चॅनेलवाले दोन दिवस बातमी चालवतील, असे सांगत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपले स्पष्टीकरण पिंपरी-चिंचवड येथे दिले.

शिवसेना आणि भाजपची युती विधानसभेलाही राहणार असल्याची घोषणा त्यांनी या वेळी केली. त्यासाठी फिफ्टी-फिफ्टी जागावाटपाचा फॉर्म्यूला ठरला असल्याचे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल, असेही त्यांनी सूचित केले.

जालना लोकसभा मतदारसंघात दानवे आणि खोतकर यांच्यात वाद भडकला होता. मात्र ऐन निवडणुकीत ते एकत्र आले. त्यानंतर विजयी झाल्यानंतर दानवे यांनी आम्हा दोघांच सेटलमेंट झाल्याचे सांगितले होते. त्यावरून पुन्हा चर्चा सुरू झाली होती. त्यावरून त्यांनी खुलासा केला.

आमचं ठरलंय असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच कोल्हापूर येथे वक्तव्य केल्यानंतर लगेच दानवे यांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) भाजपतर्फ्रे त्यांचा व पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीश बापट यांचा ते लोकसभेवर निवडून आल्याने सत्कार करण्यात आला. त्यावेळी दानवेंनी ही घोषणा केली. तसेच विधानसभेवर पुन्हा
भगवाच फडकणार असल्याचा आत्मविश्‍वासही व्यक्त केला. मुख्यमंत्री बनविण्यासाठी कामाला लागा, असे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगत मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल,असेही त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले.

नेहमीप्रमाणे आजही त्यांनी जीभ घसरली. पण ती फक्त चुकीचे नाव घेण्यापुरते मर्यादित राहिली. महापौर राहूल जाधव यांचा राहूल शेवाळे,तर शहर महिलाध्यक्षा शैला मोळक यांचा उल्लेख त्यांनी शैला मवाळ असा केला. लोकसभेला मी व बापट उमेदवार नव्हे,तर नरेंद्र मोदी हेच उमेदवार होते. म्हणूनच एवढे यश मिळाले. 2014 ला मोदींचे फक्त नाव होते. आता कामही असल्याने 2019 ला लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे, असे दानवे म्हणाले.

संबंधित बातम्या

Saam TV Live