पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्ली पोलिस आयुक्तांना याबाबतचा मेल आला आहे. हा मेल नेमका कोणी पाठवला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या मेलमुळे मोदींच्या जीवाला धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मेलची सुरक्षा यंत्रणेनीही धास्ती घेतली असून सुरक्षा यंत्रणा आणि दिल्ली पोलिस यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

मोदींना यापूर्वीही जीवे मारण्याची धमकी देण्याचे पत्र पोलिसांच्या हाती लागले होते. माओवाद्यांकडूनही यापूर्वी मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर, आता पुन्हा एकदा दिल्ली पोलिसांकडे मोदींना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल आला आहे. त्यानंतर सर्वच सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट देण्यात आला असून पोलिसांकडून या मेलची चौकशी करण्यात येत आहे.

प्राथमिक अंदाजानुसार, हा मेल पूर्वेकडील राज्यातून आल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या स्तरावर चौकशी सुरु असून पूर्ण चौकशी झाल्यानंतरच यामागे कोणाचा हात आहे ते समोर येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com