मी देवाकडे कधीच काही मागत नाही : मोदी

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 19 मे 2019

केदारनाथ : केदारनाथमध्ये रात्रभर गुहेत ध्यानधारणा केल्यानंतर आज (रविवार) सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुहेतून बाहेर आले, यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की मी कधीच देवाकडे काही मागत नाही.

केदारनाथ : केदारनाथमध्ये रात्रभर गुहेत ध्यानधारणा केल्यानंतर आज (रविवार) सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुहेतून बाहेर आले, यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की मी कधीच देवाकडे काही मागत नाही.

मोदी म्हणाले, की निवडणुकीच्या धामधुमीनंतर मला येथे ध्यानधारणा करण्याची संधी मिळाली. आध्यात्मिक क्षेत्राला जाण्याची संधी मिळाली. केदारनाथच्या विकासासाठी काम सुरु असून, येथे काम करण्याची संधी कमी मिळते. देवदर्शनाला आल्यानंतर मी कधीच काही मागत नाही. देवाकडे काही मागण्यावर माझा विश्वास नाही. येथील विकासकामांवर माझे कायम लक्ष असते.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केदारनाथ धामला भेट देत महादेवाचे दर्शन घेतले, तसेच येथे पूजाविधीही केला. मागील दोन वर्षांतील पंतप्रधान मोदींचा हा चौथा केदारनाथ दौरा आहे. मोदी आज (रविवारी) बद्रिनाथलाही भेट देणार आहेत. हिवाळ्याचा ऋतू संपल्यानंतर आता या दोन्ही देवस्थानांची दारे भाविकांसाठी खुली झाली आहेत. निवडणूक आयोगानेही पंतप्रधानांच्या या देवदर्शनाला मान्यता दिली होती. 

दरम्यान, मोदींच्या या देवदर्शनावर विरोधकांनी टीका केली आहे. मोदींनी कितीही देवदर्शन घेतले, तरीसुद्धा भाजपचा पराभव अटळ असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. 

काठीचा आधार 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रथमच काठीचा आधार घेत केदारनाथाचे दार गाठले. या,वेळी त्यांनी रुद्राभिषेक करीत शिवआराधनाही केली. तब्बल अर्धा तास पूजाविधी केल्यानंतर त्यांनी केदारनाथाच्या मंदिराला प्रदक्षिणा घातली. यानंतर त्यांनी भक्तांना हात दाखवीत अभिवादनही केले. 

Web Title: PM Narendra Modi offers prayers at Kedarnath Shrine


संबंधित बातम्या

Saam TV Live