2022 साली बेघर परिवाराकडे स्वत:चं घर असेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

2022 साली बेघर परिवाराकडे स्वत:चं घर असेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

शिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष योग्य नव्हते. केवळ मतदार तयार करणे एव्हढेच त्यांचे उद्दीष्ट्य होते. कोणत्याही योजनेत राजनितीक स्वार्थ आला, की ती योजना मोडून पडते. हे पूर्वीच्या सरकारने दाखवून दिले. मी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधान आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना फटकारले.

शिर्डीला मी नमन करतो. साईबाबांचे मंत्र आहे. सबका मालिक एक है. हे चार शब्द समाजाला एक करण्याचे सूत्र सांगतात. साईबाबा समाजाच्या सेवेचे काही मार्ग सांगितले. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने साईबाबा ट्रस्ट निरंतर सेवा करीत आहे, याचे समाधान वाटते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साईसंस्थानचे कौतुक केले.

साई शताब्दी समारोपाच्या निमित्ताने पंतप्रधान आज शिर्डीला आले होते. या वेळी ते बोलत होते. घरकुलांचे वाटप करून त्यांनी नागरिकांशी ई-संवाद साधला. मुख्य कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, 'आजही या धरतीवर अध्यात्म, विकासाशी संबंधित अनेक प्रकल्प सुरू झाले. साईंच्या चरणावर बसून गरीबांची सेवा करण्याची मोठी संधी आहे. सध्या साई नॉलेजपार्कमुळे विकास होतो आहे. 10 मेगावॅटच्या प्रकल्पाचे काम सुरू झाले. त्यासाठी संस्थानची मोठी भागिदारी आहे, हे प्रकल्प म्हणजेच दसऱ्याचे सर्वांत मोठे बक्षिस आहे.'

गरीबांच्या सेवेचे समाधान
पंतप्रधान म्हणाले, 'नवरात्रीपासून दसऱ्यापर्यंत देशातील नागरिक गाडी, टीव्हीसारख्या अनेक साहित्यांची खरेदी करतात. त्यामुळे घराघरांत आनंद आहे. राज्यातील अडीच लाख भाऊ-बहिणींसाठी जे आज घरे मिळाले, त्यांच्या घरातील आनंद हा गगणात न मावणार आहे. ते मी देऊ शकलो, याचा अभिमान आहे. मी गरीबांची सेवा करू शकलो, याचे मला समाधान वाटते. हीच माझ्यासाठी दसऱ्याची पूजा महत्त्वाची आहे. नवीन घरे आपल्या स्वप्नाला प्रोत्साहन देतील. गरीबांवर जिद्दीने तोंड देण्याचे हे पहिले पाऊल आहे. आपले घर गरीबांशी लढण्याशी ताकद देते. चांगल्या घरामुळे सन्मान वाटतो. स्वातंत्र्याला 75 वर्षे होतील, तोपर्य़ंत देशातील सर्व बेघरांना घर मिळालेले असतील. याचा मोठा टप्पा आम्ही पार केला आहे.'

घरांचे अनुदान वाढविले
गरीबांची सेवा करण्याचा भाव असल्याने काम केल्याने असे परिणाम दिसून येतात. पहिल्या सरकारला एक घर बनविण्यासाठी १८ महिने लागत होते. आमच्या सरकारने १२ महिन्यांत घर तयार करून दिले. आम्ही घरांचे आकारही मोठा केला. त्याबरोबरच ७० हजार रुपये वाढवून १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान दिले. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही रक्कम थेट लाभार्थींच्या खात्यावर मिळते. तसेच दर्जेदारपणाकडेही अधिक लक्ष दिले जाते.

योजनेचा लाखोंना फायदा
गरीबांना मदत केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील खुशी मला नवीन कामाची उर्जा मिळते. मला सर्वांनी आशीर्वाद दिले, अशी सेवा आगामी काळात मिळावी. प्रत्येक घरात शाैचालये होण्यासाठीच्या योजना सुरू आहेत. महाराष्ट्रात ११ कोटी नागरिकांना धन्यवाद की त्यांनी चांगले काम करून घराघरांत शाैचालये बांधली. जन आरोग्य योजनेंतर्गंत महाराष्ट्रातील लाखो लोकांना या योजनेचा लाभ मिळाला. अजून महिनाही झाला नाही, तोच एक लाख लोकांनी याचा लाभ घेतला आहे. गरीबांचे ट्युमर हटविले, तर काहींचे ५० हजार ते ३ लाखांपर्यंतचे मेडिकल बील भरले. एव्हढी मोठी रक्कम गरीबांना खर्च करावी लागत असल्यानेच ते रुग्णालयापर्यंत जाऊ शकत नव्हते. आता त्यांच्यावर उपचार होत आहेत. या योजनेमुळे देशात आधुनिक मेडीकल इन्फास्ट्रक्चर मिळाले आहेत. हजारो नवीन रुग्णालये उभी राहत आहे. हे रुग्णालये रोजगार उपलब्धीही करून देत आहे.

दुष्काळात विमा अनुदान मिळेल
महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला. मी आवाहन करतो, की पंतप्रधान विमा योजनेमुळे लवकरच सर्वांना नुकसान भरपाई मिळेल. महाराष्ट्र सरकार जो काही निर्णय घेईल, त्याला केंद्र सरकार मदत करेल. प्रधानमंत्री कृषी योजनेंतर्गंत महाराष्ट्रात अनेक प्रोजेक्टवर काम सुरू आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून चांगली कामे झाली. १६ हजार गावे दुष्काळमुक्त झाले. ९ हजार गावे लवकरच दुष्काळमुक्त होणार आहेत. शेती उत्पादन चांगले व्हावे, त्यातून लाभ चांगला मिळावा, यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे, असे मोदी म्हणाले.

पर्यटन जोडण्यासाठी मोठी योजना
शिर्डी, अजिंठा, वेरुळ अशा पर्यटकीय स्थळांना जोडण्यासाठी मोठी योजना घेवून आलो आहे. जगाशी जोडण्याचे काम सुरू आहे. शिर्डीत मागील वेळी राष्ट्रपती आले, त्या वेळी त्यांनी विमानतळ दिले. सध्या असलेल्या विमानसेवेत अजूनही वाढ केली जाणार आहे. त्यामुळे जगातील साईभक्त सहज शिर्डीला येवू शकतील. संत, महात्म्यांनी जी शिकवण दिली, ती कायम आचरणात आणावी. तोडणे सोपे असते, जोडणे अवघड असते. आपण समाज जोडू, असे ते म्हणाले. सबका साथ, सबका विकास हाच संकल्प घेतला अाहे. त्यामुळे सर्वांनी याच संदेशाला घेवून पुढे चालावे. साईबाबांनी जो मार्ग दाखविला, त्याच मार्गाने आपण पुढे जाऊ. मुख्यमंत्री फडणवीस व त्यांच्या टीमला मी शुभेच्छा देतो, त्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून राज्यात चांगले काम केले.

मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्देः
- शताब्दी वर्षात शिर्डीला येण्याची संधी मिळाली त्याचा मनापासून आनंद होतोय.
- तुमच्या प्रेमामुळे मला नवी ऊर्जा मिळते.
- साईसेवकांना मी मनापासून नमन करतो.
- सबका मालिक एक साईबाबांचा मंत्र
- साई समाजाचे होते, समाज साईंचा होता.
- साईंनी समाजसेवेचे मार्ग दाखवले.
- साईंनी दाखवलेल्या मार्गावर साई ट्रस्ट काम करतेय.
- आजच्याच दिवशी साईबाबा इंग्लिशन मीडियम स्कूल, कन्या विद्यालयाचे भूमिपूजन होत आहे.
- स्वच्छ उर्जेमध्ये साई ट्रस्टची महत्वाची भूमिका.
- घर देण्याचे प्रयत्न यापूर्वी सुद्धा झाले पण गरीबांना घर देऊन त्यांना सशक्त करण्याऐवजी एका कुटुंबाचे हित संभाळण्यात रस होता. वोट बँक तयार करण्याचा उद्देश होता.
- काँग्रेसचे नाव न घेता मोदींची टीका.
- याआधीच्या सरकारने पहिल्या चारवर्षात फक्त 25 लाख घरे बांधली
- मागच्या चारवर्षात भाजपा नेतृत्वाखालील सरकारने 1 कोटी 25 लाख घरे बांधली.
- काँग्रेसचे सरकार असते तर 1 कोटी 25 लाख घरे बांधायला 20 वर्ष लागली असती.
- मी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधानः मोदी
- आयुषमान भारत योजनेचा 1 लाख लोकांनी लाभ घेतला.
- महाराष्ट्र सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंकटावर मात करण्याचा प्रयत्न केला.
- या योजनेमुळे राज्यातील 16 हजार गावे दुष्काळ मुक्त झाली, आणखी 9 हजार गावे दुष्काळ मुक्तीच्या मार्गावर आहेत.
- दुष्काळात महाराष्ट्राला पूर्ण साथ देऊ.
- पंतप्रधान विमा योजनेतून मदत करु.
- आयुष्यमान भारत योजनेतून नवीन हॉस्पिटल सुरु होतील.
- महाराष्ट्राने सामाजिक समरसता शिकवली.
- महाराष्ट्रातील संतांनी समानतेचा मार्ग दाखवला.
- नवीन घरे तुमच्या आकांक्षाना नवीन आयाम देतील.
- 2022 साली बेघर परिवाराकडे स्वत:चे घर  असेल हेच लक्ष्य ठेऊन काम करतोय.
- लाभार्थ्यांनी मोदींना नंदूरबारला येण्याचे निमंत्रण दिले
- मोदींनी यावेळी त्यांची नंदूरबारमधील चौधरी चायची आठवण सांगितली
- घरासाठी तुम्हाला लाच द्यावी लागली नाही याचे समाधान
- दलालाची साखळी संपत चालली असल्यामुळे त्यामुळे ते त्रस्त आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com