‘पीएमपी’च्या ताफ्यातील शेकडो बस भंगारात

‘पीएमपी’च्या ताफ्यातील शेकडो बस भंगारात

पुणे - ‘पीएमपी’च्या ताफ्यातील शेकडो बसचे आयुर्मान संपले आहे. परंतु, त्या धावत असल्यामुुळे वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होतात. त्यामुळे ‘पीएमपी’ प्रशासनाने आयुर्मान संपलेल्या बस ‘स्क्रॅप’ करण्याचा निर्णय घेतला. वर्षअखेरपर्यंत ४३० बस ‘स्क्रॅप’ करण्यात येणार आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक वाहतूक सेवा पुरविणाऱ्या ‘पीएमपी’च्या ताफ्यात सुमारे १ हजार ९६३ बस आहेत. त्यातील ५०० पेक्षा अधिक बसचे आयुर्मान संपले आहे. मात्र बसच्या कमतरतेमुळे जुन्या, खराब बस दुरुस्त करून त्या वापरल्या जातात. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. त्या बंद करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. दरम्यान, पीएमपीने १ हजार ६४० नवीन बस घेण्याची घोषणा नुकतीच केली. त्यातील सुमारे ४५० बस या वर्षअखेरपर्यंत ‘पीएमपी’च्या ताफ्यात सामील होणार आहेत. जशा नव्या बस येतील. तशा जुन्या बसची सेवा थांबविण्यात येणार आहे, असे ‘पीएमपी’ प्रशासनाने सांगितले.

‘पीएमपी’च्या ताफ्यातील आयुर्मान संपलेल्या बसचे ‘ब्रेकडाऊन’ होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षामध्ये वाढले आहे. तसेच अनेक जुन्या बस भर रस्त्यात पेटल्या होत्या. गाड्या खिळखिळ्या झाल्यामुळे मोठा आवाज होतो. तसेच खिडक्‍यांसह आसने तुटलेली, इंजिनचा प्रचंड आवाज, गळके छत, असे चित्र या जुन्या बसचे असते. त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान त्रास सहन करावा लागत होता.

शहराचे प्रदूषण कमी करण्यासाठी ‘पीएमपी’च्या ताफ्यातील डिझेलच्या बस कमी करण्यात येत आहेत. तसेच ‘पीएमपी’कडे ज्या प्रमाणात नवीन बस येतील त्या प्रमाणात आयुर्मान संपलेल्या जुन्या झालेल्या बस सेवेतून निवृत्त केल्या जाणार आहेत.
- सुनील बुरसे, मुख्य अभियंता, पीएमपी

Web Title: PMP 430 Bus Scrap

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com