पावसाची दडी ; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

पावसाची दडी ; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

अकोला- हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदा पाऊस चांगला पडणार असल्याचे जाहिर करण्यात अाले होते. मात्र एेन पेरणीच्या तोंडावर अाणि नंतर बीजे अंकुरल्यानंतर पावसाने मारलेल्या दडीमुळे जिल्ह्यातील काही तालुक्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले होते. हे संपत नाहीत तोच अाता पुन्हा पिके जोमात असताना पावसाने पुन्हा उघडीप दिली अाहे. यामुळे सोयाबीन भरण्याच्या मौसमात पावसाने फिरवलेल्या पाठीमुळे शेंगा भरत नसल्याचे चित्र अाहे. अागामी तीन ते चार दिवसात पाऊस न परतल्यास जिल्ह्यातील सोयाबीन पीक हातचे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत अाहे.

मूर्तिजापूर: पावसाने प्रदीर्घ धाडी मारली असून पावसाअभावी पिकांनी तालुक्यात माना टाकल्या अाहेत. सोयाबीन धोक्यात आले आहे. शेतकरी हवालदील झाले आहेत. यंदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा पेरा केला आहे. पिके हिरवीगार दिसून येत आहेत, पण पाण्याअभावी सोयाबीनच्या शेंगा भरल्या नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. सुरुवातीला तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस पडला. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. पण पिकाला आवश्यक असा पाऊस पडला नाही. त्यामुळे सध्या सोयाबीन पिकांची अवस्था गंभीर आहे. कापूस पिकाला पर्याय म्हणून सोयाबीन पिकाचीओळख आहे. सोयाबीन पासुन अनेक उत्पादन तयार करण्यात येतात. परंतु तुलनेत अधिक पाण्याची आवश्यकता असलेले हे पीक पावसाने प्रदिर्घ दांडी मारल्याने धोक्यात आले आहे. पावसाअभावी या पिकाची अवस्था बिकट झाली असून शेतकरी पाण्यासाठी चातकासारखी वाट पाहून आभाळाकडे एकटक लक्ष देवुन आहे. सोयाबीन दिसते चांगले, मात्र शेंगा भरल्या नाहीत, त्यामुळे शेतकरी बांधव हवालदील झाला आहे. पिके हिरवीगार आहेत पण त्यांना जीवनदान देण्यासाठी, शेंगा भरण्यासाठी किमान एका दमदार पावसाची नितांत आवश्यकता आहे.

ज्यांच्याकडे मुबलक प्रमाणात पाणी आहे. त्या शेतकऱ्यांनी पाणी देवुन पिकाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, पणा पण ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची काही सोय नाही त्या शेतकऱ्यांवर आज उपासमारीची वेळ आल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. जर आठवडाभरात पावसाने हजेरी लावली नाहि, तर सोयाबीन पिक हातातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सोयाबीन धोक्यात आहे. पावसाची नितांत गरज आहे. अलिकडे सोयाबीन उत्पादनाच शेतकऱ्यांची संपूर्ण भीस्त असते.जलयुक्तची कामे मोठ्य प्रमाणात व्हावीत. त्यामुळे अशा स्थितीत शेतकरी आश्वस्त राहील. -राजुभाऊ वानखडे, शेतकरी,

बाळापूरः तालुक्यात सुरूवातीला पावसाने दमदार हजेरी लावली होती. नदी, नाले, विहिरी तुडूंब भरल्या होत्या. मात्र अाता पोळा सण उलटूनही तालुक्यात पावसाने अागमन न केल्यामुळे खरीपाची पिके धोक्यात अाली अाहेत. असे असताना अाता शेतकऱ्यांची दारमोदार केवळ सोयाबीन पिकावर असून तेच पावसाअभावी जात असेल तर शेतकरी पुरता अार्थिक संकटात सापडणार असल्याची शक्यात नाकारता येत नाही. तालुक्यात सर्वाधिक सोयाबीनची पेरणी केलेली अाहे. अाता सोयाबीनला शेंगा लगडत असताना पाऊसाने दाखवलेली पाठ जीवघेणी ठरणार अाहे. तीन ते चार दिवसात तालुक्यातील रब्बी पिकांना पावसाची नितांत गरज अाहे.

बोरगावमंजूः परिसरात तब्बल दहा ते बारा दिवसापासून पावसाने उघडीप दिली अाहे. त्यामुळे सध्या सोयाबीनचे पिक सुकून जात असल्याचे चित्र अाहे. ज्या शेतकऱ्यांकडे पिकांना पाणी पुरवण्याची सुविधा अाहे ते शेतकरी हातात अालेले पिक जगवण्यासाठी धडपडत अाहेत तर दुसरीकडे मात्र अल्पभुधारक शेतकरी संपूर्णतः निसर्गांवर अवलंबून असल्याने त्यांच्या शेतातील पिके सुकत अाहेत. तर मध्येच वीजेच्या भारनियमनामुळे रात्री अपरात्री शेतकऱ्यांना पिकांना पाणी द्यायला जावे लागत अाहे. सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांपासून तर जंगली प्राण्यापासून शेतकऱ्यांच्या जीवीत्वास धोका निर्माण झाला अाहे.

तेल्हाराः यंदा सर्वाधिक कमी प्रजन्यमान असलेला तालुका म्हणून तेल्हारा तालुका अाहे. या तालुक्यात वरूणराजाने सुरूवातीपासूनच पाठ दाखवलेली अाहे. अशातच कपाशी पिकावर अालेल्या बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले तर अाता सोयाबीनला शेंगा लागत असताना पावसाने पुन्हा पाठ दाखवली अाहे. अागामी तीन ते चार दिवसात पाऊस न अाल्यास सोयाबीन पिक हातचे जाण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली अाहे. तालुक्यात बहुतांश भागात नदी, नाले, विहिरी कोरडे ठाक पडलेले असल्याचे चित्र अाहे. पाऊस न परतल्यास तालुक्यातील पिके हातची जाऊन पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार अाहे.

पातूर,बार्शीटाकळी, अकोट तालुक्यातही परिस्थिती चिंताजनक
जिल्ह्यात पावसाने मागील अाठ ते पंधरा दिवसापासून दडी मारली अाहे. यामुळे जिल्ह्यातील पातू, बार्शीटाकळी तालुक्यातील पिके धोक्यात अाली अाहेत. तर अकोट तालुक्यात मागील अाठ दिवसापासून पाऊस नसल्याची माहिती अाहे. काही भागातील शेतीसाठी हे लाभदायक अाहे तर काही भागातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढत असल्याची माहिती देण्यात अाली अाहे.

Web Title: problem facing Soybean harvest due to no rain long time

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com