गिरीश बापटांच्या नियोजनशून्य कारभारामुळे पुणे शहरात पाणी टंचाई निर्माण झाली - मोहन जोशी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 मे 2019

पुणे : "पुणे शहरातील कृत्रिम पाणी टंचाईला पालकमंत्री गिरीश बापट हेच जबाबदार आहेत. त्यांचेच हे महापाप आहे,' असे सांगून ,"बारामती लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना मतदान व्हावे, यासाठी त्यांनी कालव्यातून भरपूर पाणी सोडले,' अशी टीका काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी गुरुवारी केली. 
गेल्या काही दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा विस्कळित झाला आहे. 

शहरातील पाणी पुरवठ्यात कपात करण्याचे प्रयत्न महापालिका आणि पाटबंधारे खात्याकडून सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर जोशी यांना विचारले असता, त्यांनी ही टीका केली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, अभय छाजेड, संजय बालगुडे, रमेश अय्यर आदी मान्यवर उपस्थित होते. जोशी म्हणाले," पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा होता. त्यांचे नियोजन पालकमंत्र्यांना करता आले नाही. त्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळेच पुणे शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना दौंड भागात मतदान व्हावे, यासाठीच त्यांनी पुणे शहराला वेठीस धरून कालव्यातून भरमसाट पाणी सोडले.'' 

मतदानाच्या दिवशी वडगाव शेरी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात तीन वेळा मशिन बंद पडले, असे सांगून जोशी म्हणाले," त्यामुळे त्या ठिकाणी मतदानाची वेळ वाढवावी, अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे केली होती. परंतु वेळ वाढून देण्यात आली नाही. यावरून प्रशासन भाजपच्या फायद्यासाठी काम करीत होते की काय अशी शंका निर्माण झाली आहे.'' 

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंग ठाकूर यांनी तत्कालीन एसटीएस अधिकार व ठाण्याचे पोलिस आयुक्त धरमवीरसिंग यांच्यावर मारहाणीचे आरोप केले आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले होते," प्रज्ञासिंग यांनी महाराष्ट्र पोलिसांविरुद्ध तक्रार दिल्यास आपण कारवाई करू.'' त्यानुसार आता मुख्यमंत्र्यांनी धरमवीरसिंग आणि अधिकाऱ्यांना अटक करून दाखवावी, असे आव्हान यावेळी संजय बालगुडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. 
 
Web Title: Girish Bapat is responsible for the scarcity of water in Pune says Mohan Joshi

संबंधित बातम्या

Saam TV Live