किडनीविकार असूनही मिळविले ८७ टक्के

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 मे 2019

पुणे - जन्मतःच धीरज दळवे याला एकच किडनी होती. ती सुद्धा खराब असल्याने लहानपणापासूनच डायलिसिस होत होते. किडनी ट्रान्स्प्लांट करणे आवश्‍यक होते. त्यामुळे बारावीदरम्यान किडनी बदलली. एकीकडे आई-वडिलांचे कष्ट दुसरीकडे शरीरात असंख्य वेदना होत होत्या. तरीही जिद्दीने अभ्यास करून बारावीला ८७ टक्के गुण मिळविले.

लहानपणी धीरजला जेव्हापासून कळायला लागले तेव्हापासून डायलिसिस सुरू होते. तो सहावीत असताना किडनी बदलावी लागणार असे डॉक्‍टरांनी सांगितले. वय लहान असल्याने तेव्हा करता आले नाही. परंतु बारावी आणि ऑपरेशनची वेळ एकच आली. आईचीच किडनी देऊन ऑपरेशन झाले. त्याच्या तब्येतीसाठी वापरायच्या गोष्टी उकळलेल्या पाण्यात साफ करून आई देत होती. तर वडिलांना दर महिन्याला दवाखाना व इतर सर्व गोष्टी सांभाळाव्या लागत होत्या. या दरम्यान रिकाम्या वेळेत तो अभ्यास करत होता.

कॉलेजला फक्त अकाउंट्‌स विषयाच्या तासाला जायचा. पहिले सहा महिने त्याने सवडीने अभ्यास केला. परीक्षाजवळ आल्यावर नियोजन तयार केले. ‘‘तुला जितके टक्के मिळतील तितका मला आनंद आहे,’’ असे आई-वडिलांनी सांगितले होते. तेव्हाच त्याने ठरवले ‘‘काहीही झाले तरी अभ्यास करून मोठे व्हायचे आणि आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करायचे.’’ त्यानुसार अभ्यास करून वाणिज्य शाखेत त्याने ८७ टक्के गुण मिळवले. आता त्याला ‘सनदी लेखापाल’ होऊन घरातील परिस्थिती सुधारायची आहे. नव्याने मिळालेले आयुष्य फक्त आई- वडिलांसाठीच जगायचे आहे.

Web Title: HSC Result Dhiraj Dalave Kidney Problem Success Motivation

संबंधित बातम्या

Saam TV Live