झोपेत असताना कोंढवा परिसरातील मजुरांवर काळाचा घाला

झोपेत असताना कोंढवा परिसरातील मजुरांवर काळाचा घाला

पुणे : हाताला काम, पोटाला भाकरी आणि राहायला आसरा मिळेल, म्हणून त्यांनी लेकराबाळांसह बिहारमधून पुणे गाठले. एका बांधकाम प्रकल्पावर ते काम करीत होते. तिथेच एका संरक्षक भिंतीच्या आधाराने झोपडीत राहू लागले. नेहमीप्रमाणे शुक्रवारी त्यांनी काबाडकष्ठ केले, रात्री जेवले, एकत्र गप्पागोष्टी केल्या आणि झोपले. झोपेतच ज्या भिंतीने आधार दिला, तीच भिंत भल्या पहाटे त्यांच्या संसारावर कोसळली आणि बघता-बघता 15 जणांना मृत्युने साखरझोपेत गाठले.

बिहारमधील वेगवेगळ्या जिल्हातील कटीयार, कोंडीयाल छोट्या-छोट्या खेडयातून पोट भरण्यासाठी अनेक मजूर पुण्यासह मुंबई व अन्य शहरात दाखल होतात. त्याप्रमाणेच कटीयार जिल्हातील शर्मा, सिंह, देवी अशी वेगवेगळी कुटुंबे आपल्या कुटुंब कबिल्यासह पुण्यातील कोंढवा परीसरात दाखल झाली. एका बांधकाम प्रकल्पवर काही दिवसांपासून काम करु लागले.

दरम्यान, बांधकाम व्यावसायिकाने मजुरांना राहण्यासाठी शेजारीच असलेल्या एका सोसायटीच्या संरक्षक भिंतीजवळ "ट्रांझिट  कॅम्प"च्या झोपड्या थाटल्या. याच झोपड्यात कामगार व त्यांचे कुटुंब गेल्या काही दिवसांपासून वास्तव्य करीत होते. शुक्रवारी दिवसभर काम सूरु असतानाही कामगारांनी इमारतीमध्ये काम केले. त्यानंतर सर्वजण सायंकाळी काम संपल्यानंतर नेहमीप्रमाणे एकत्र गप्पागोष्टी करीत होते. महिलांनी जेवण बनवून सर्वांनी जेवण केले. काही वेळ मुलांसमवेत खेळले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काम करण्यासाठी लवकर उठण्यासाठी सर्वजण झोपी गेले. 

सगळेजण पहाटेच्या साखरझोपेत असतानाचा ज्या भिंतीच्या आधाराने त्यांचे संसार फुलू लागले होते, त्याच भिंतीने घात केला. ती भिंत त्यांच्या झोपडयावर कोसळली. त्यामध्ये 16 कामगार, त्यांच्या बायका-मुलांचाही मृत्यू झाला.

मृतांची अधिकृत यादी : 
1) आलोक शर्मा - 28 वर्षे 
2) मोहन शर्मा - 24 वर्षे 
3) अमन शर्मा - 19 वर्षे 
4) अजितकुमार शर्मा - 7 वर्षे 
5) रवि शर्मा -19 वर्षे 
6) लक्ष्मीकांत सहानी - 33 वर्षे 
7) अवदेश सिंह - 32 वर्षे 
8) सुनील सिंग - 35 वर्षे 
9) ओवी दास - 2 वर्षे  
10) सोनाली दास - 6 वर्षे  
11) भिमा दास - 28 वर्षे 
12) संगीता देवी - 26 वर्षे 
13) रावलकुमार शर्मा - 5 वर्षे 
14) निवा देवी - 30 वर्षे 
15) दिपरंजन शर्मा

Web Title: 15 died at night in Kondhawa accident
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com