पुणे सोलापूर रस्त्यावर कार - ट्रकची जोरदार धडक, अपघातात 9 जणांचा मृत्यू

पुणे सोलापूर रस्त्यावर कार - ट्रकची जोरदार धडक, अपघातात 9 जणांचा मृत्यू

पुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोरजवळील कदमवाक वस्ती ग्रामपंचायतीसमोर मध्यरात्री ट्रक आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात कारमधील नऊ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एकढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर रस्त्यावर कदमवाकवस्ती येथे दुभाजक ओलांडून आलेल्या इरटीका कारने ट्रकला धडक दिली. या अपघातात कारमधील 9 जण जागीच ठार झाले. कारमधील सर्वजण हे यवत (ता. दौंड) येथील रहिवाशी आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. पण, कारमधील सर्व नऊ जणांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर कारचा चक्काचूर झाल्याचे दिसत होते. हा अपघात शुक्रवारी ( ता. १९) रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी झाला. दोन जण गाडीत अडकले होते. त्यांना अग्निशमन दलाने बाहेर काढले.

मृतांमध्ये अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महंमद आशपाक अत्तार, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत गिघे, दत्ता गणेश यादव व जुबेर अजित मुलाणी यांचा समावेश आहे. अपघातानंतर यवतवर शोककळा पसरली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: 9 students dead in accident on Pune Solapur highway
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com