प्रदूषणावर मात करण्यासाठी बनवली इलेक्‍ट्रिकल कार

प्रदूषणावर मात करण्यासाठी बनवली इलेक्‍ट्रिकल कार

पुणे : वाहनांमुळे होणाऱ्या वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी काही अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी चक्क एक लाख रुपयांमध्ये इलेक्‍ट्रिकल कारची निर्मिती केली आहे. शेतकरी शिक्षण मंडळाच्या नऱ्हे येथील भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्‍ट्रिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी ही कमाल केली आहे.

अशी असेल कार : 

या विद्यार्थ्यांनी इंधनावर चालणाऱ्या वाहनाला'इलेक्‍ट्रिक कार'मध्ये परिवर्तित केलं आहे. यासाठी सोळा वर्ष पूर्ण झालेल्या जुन्या मारुती 800ची निवड करण्यात आली. यासाठी गाडीच इंजिन काढून त्याजागी 7.5 एचपीची इलेक्‍ट्रिक मोटर बसवण्यात आली आहे. या कारमध्ये लिथिअम आयन बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. ही कार चार्ज होण्यासाठी 3 तास लागतात व एकदा चार्ज केल्यावर ही कार 50 किलोमीटर चालू शकते. भारतात 'इलेक्‍ट्रिक कार'त्यांच्या प्राथमिक स्तरावर असल्यामुळे त्यांच्या किमती जास्त आहेत व त्या प्रत्येकाला परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळे आपली जुनी वाहने कमीत कमी किमतीत'इलेक्‍ट्रिक कार'मध्ये परिवर्तित करण्याचा चांगला उपाय या विद्यार्थ्यांनी लोकांसमोर उभा केला आहे.

विद्युत अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या ऋषिकेश खेडकर, संदीप बाबर, ऋषिकेश जगताप, श्रीकांत दुधाने, मयूर तनपुरे, ओंकार डोळे, रोहित खवास, हिमानी पाटील, गायत्री घस्ते या विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून या कारची निर्मिती करण्यात आली असून, यासाठी 1 लाख रूपये खर्च आला आहे. 

Web Title: Engineering students invented an electric car in 1 lakhs

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com