पुण्याचा निकाल किती वेळात लागणार ?

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 मे 2019

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या (ता.23) सकाळी आठ वाजता सुरवात होणार आहे. जिल्हा निवडणूक प्रशासनाने अंतिम निकाल कधी हाती येतील, हे
स्पष्ट केलेले नाही. मात्र, जिल्ह्यातील पुणे लोकसभा मतदारसंघात इतर तीन मतदारसंघाच्या तुलनेत मतमोजणीच्या फेऱ्या कमी आहेत. त्यामुळे पुण्याचा निकाल पहिल्यांदा लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 23 एप्रिलला तर शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी 29 एप्रिल रोजी मतदान झाले होते. पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामामध्ये होणार आहे. तर, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात होणार आहे.

1997 मतदान केंद्रांसाठी 96 काऊंटिंग टेबल 

पुणे लोकसभा मतदारसंघात 1997 मतदान केंद्र असून, सहा विधानसभानिहाय मिळून एकूण 96 काऊंटिंग टेबल असतील. या मतदारसंघात सरासरी प्रत्येकी 21 फेऱ्या होतील.

Web Title: marathi news pune loksabha election results to come out soon

संबंधित बातम्या

Saam TV Live