पुणे पालिकेकडून सल्लागारांचे खिसे गरमागरम

पुणे पालिकेकडून सल्लागारांचे खिसे गरमागरम

पुणे महापालिकेचा अजब-गजब कारभार उघड झालाय. पालिकेनं सल्लागारांवर ९ वर्षांत चक्क ६४ कोटींची उधळपट्टी केलीय. हा आकडा ऐकून सगळेच सैरभेर झालेत. नगरसेवकांनी मुख्य सभेला विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल हा आगळावेगळा कारभार चव्हाट्यावर आलाय. 

महापालिकेने अत्यंत किरकोळ किरकोळ कामांसाठी हे पैसे खर्च केलेत. विकासकामांच्या नावाखाली सल्लागारांचे खिसे भरण्याचा उद्योग पुणे महापालिकेनं का केला असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतोय. या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सत्ताबदल झाल्यावरही सल्लागारांवर ही उधळपट्टी सुरूच आहे. 

किरकोळ कामांसाठी सल्लागारांवर खर्च
- पथ विभागाकडून सर्वाधिक 33 कोटी 33 लाख रुपयांचा खर्च करण्यात आलाय. 
- रस्ता रुंदीकरणापासून नवीन डीपी रस्ते उड्डाणपूल, 
- सिमेंट कॉक्रिटीकरण, 
- पावसाळी पाण्याचे व्यवस्थापन, 
- सायकल आराखडा करणं
- ड्रेनेज विभागाने 14 कोटी रुपयांचा खर्च सल्लागारांवर केला आहे.
- 11 गावांचा स्टॉर्म वॉटर आराखडा, 
- मैलापाणी प्रकल्प विभागाकडून 10 कोटी 64 लाखांचा खर्च 
- उड्डाणपूल आणि नदीवरील पुल बांधण्यासाठी सल्लागावर खर्च केला आहे.
- पाणी पुरवठा विभागाने जवळपास साडेचार कोटी 
- घनकचरा व्यवस्थापन विभागाने दीड कोटींच्या जवळपासचा खर्च सल्लागारांवर केला आहे.

सल्लागारांवर कोटीच्या कोटी उधळले जात असतील तर महापालिकेच्या प्रत्येक विभागात जे अधिकारी, अभियंते आहेत, त्यांचं नक्की काय काम? सल्लागारांनाच एवढे पैसे द्यायचेच असतील तर त्यांनाच पालिका चालवायला द्या असा सूर उमटतोय.

WebTitle : marathi news pune municipal corporations expenditure on consultants

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com