नही बदलेगा चौकीदार; भाजपची निकालाआधीच पुण्यात होर्डिंग्ज

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 मे 2019

पुणे: 'पुणे तिथे काय उणे' या म्हणीप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पुण्यातील मंडई परिसरात निवडणूक निकालाआधीच विजयाच्या उत्साहात होर्डिंग्ज लावण्यात आली आहे. तसेच मतदारांचे आभारही मानण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सदस्य नगरसेवक हेमंत रासने यांच्याकडून ही होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत. 

भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असून त्यांनी उद्या दिवसभर निकाल पाहण्यासाठी एलईडीस्क्रीनची सोयही करण्यात आली आहे. या एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून या परिसरातील लोकांना दिवसभर देशातील निवडणूक निकालाचे काय चित्र आहे ते पाहता येणार आहे.

दरम्यान, होर्डिंग्जवर 'कितना भी करलो हाहाकार नही बदलेगा चौकीदार अशा आशयाचा मजकूर लिहण्यात आला आहे'. तसेच निकाल लागल्यानंतर सर्वांचे तोंड गोड करण्यासाठी म्हणून 350 किलो पेढे मागविण्यात आले आहेत.

Web Title: marathi news pune nahi badlega chowkidar loksabha election results hoardings before results

संबंधित बातम्या

Saam TV Live