पुणे : शहरातील घोरपडे पेठेत रविवारी मध्यरात्री एका जुन्या तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात घोरपडे पेठेतील तीन मजली जुनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील काही भाग कोसळला. इमारतीतील सर्व रहिवाशांना बाहेर काढले. इमारतीत वीस ते पंचवीस नागरिक राहत होते. तर तिसऱ्या मजलीवर सात ते आठ कुटुंब राहत होती.
लाकूड आणि मातीचे जूने बांधकाम असलेली ही इमारत आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरु असल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. आता ही उर्वरित धोकादायक इमारत पाडली जाणार आहे.
Web Title: old building in ghorpade peth collapsed in Pune
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.