विश्रामबाग पोलिसांनी जप्त केलेत 67 लाख 30 हजार रूपये किंमतीचे स्टॅम्प पेपर

विश्रामबाग पोलिसांनी जप्त केलेत 67 लाख 30 हजार रूपये किंमतीचे स्टॅम्प पेपर

पुणे : तेलगी स्टॅम्प घोटळ्यानंतर आता पुण्यात आणखी एका स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा विश्रामबाग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शनिवार वाडयाजवळील लाल महालासमोर असलेल्या कमला कोर्ट बिल्डींगमधून विश्रामबाग पोलिसांनी तब्बल 67 लाख 30 हजार रूपये किंमतीचे 100 आणि 500 रूपयांचे स्टॅम्प पेपर जप्‍त केले असुन याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ कोषागार अधिकारी आणि प्रथम मुद्रांक लिपीक कोषागार करिता शिक्‍का तयार करून स्टॅम्प पेपरवर हा शिक्‍का मारून हा घोटाळा करण्यात येत होता.        

याप्रकरणी चिन्मय सुहास देशपांडे (26), सुहास मोरेश्‍वर देशपांडे (59) आणि सुचेता सुहास देशपांडे (54, तिघे रा. 183, कसबा पेठ, पारसनीसवाडा, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विजय विश्‍वनाथ जाधव यांनी फिर्याद दिली आहे. देशपांडे दाम्पत्य मुलासह कोषागार कार्यालयातून स्टॅम्प काढून नंतर त्यावर बनावट शिक्क्याचा वापर करून ते स्टॅम्प पेपर ब्लॅकने विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपायुक्‍त सुहास बावचे, विश्रामबाग पोलिस ठाण्यातील वरिष्ठ सुनिल कलगुटकीकर आणि त्यांच्या पथकाने कमला कोर्ट बिल्डींगमधील देशपांडे यांच्या शनिवार पेठेतील पर्वती माता सोसायटीतील शॉप नंबर 1 आणि बुधवार पेठेतील देशपांडे व्हेंडरच्या दुकानावर छापा टाकला. तेथून 100 आणि 500 रूपये किंमतीची 67 लाख 30 हजार रूपयांची स्टॅम्प पेपर जप्‍त करण्यात आली आहेत.

देशपांडे दाम्पत्य आणि त्यांच्या मुलाने आपआपसात संगनमत करून कुठलाही अधिकार नसताना वरिष्ठ कोषागार अधिकारी आणि प्रथम मुद्रांक लिपीक कोषागार असा शिक्‍का तयार केला. कोषागार कार्यालयातून स्टॅम्प पेपर बाहेर काढताना हा शिक्‍का मारला जातो. देशपांडे दाम्पत्य आणि त्यांच्या मुलाने स्टॅम्प पेपरवर हा शिक्‍का मारून स्टॅम्प पेपरची विक्री केली. आरोपींनी एवढया मोठ्या रक्‍कमेचे स्टॅम्प पेपर कोठुन आणले याबाबत तपास चालु आहे. अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची 21 जून पर्यत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

WebTitle : Marathi News Pune Police Confiscated Stamp Papers Of Worth 67 Lakh 30 thousand

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com