पुण्यात रेल्वेच्या घातपाताचा कट; रुळावर आढळले लोखंडी तुकडे 

अमोल कविटकर
शनिवार, 18 मे 2019

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात रेल्वेला अपघात करण्याचा कट शिजतोय. रेल्वे प्रशासनानंच त्याला दुजोरा दिलाय. रेल्वे रुळांवर  लोखंडी रॉड ठेवून अपघात घडवण्याचा प्रयत्न केला जातोय. गेल्या दोन-तीन महिन्यात आठ ते दहा वेळा असे प्रकार घडल्याचं समोर आलंय. विशेषकरुन निर्मणुष्य ठिकाणी असे प्रकार घडतायंत. सातत्याने घडत असलेल्या प्रकारांमुळं पोलिस आणि रेल्वे प्रशासनही चक्राऊन गेलंय.

यामागे लुटीचा उद्देश आहे की जीवितहानी घडवण्याचा डाव हा तपासाचा भाग आहे, मात्र सातत्याने होणाऱ्या या घटनांमुळे प्रवाशांच्या जीवात धडकी भरलीय.

रेल्वे रुळांची देखभाल आणि दुरुस्तीसाठी ट्रॅकमॅन आहेत. मात्र त्यांची संख्या अपुरी असल्याने सर्वच ठिकाणी त्यांना लक्ष ठेवता येत नाही. अशावेळी एका जागृत नागरिकाचं कर्तव्य बजावा, रुळावर कोणी लोखंडी रॉड ठेवताना तुमच्या निदर्शनास आल्यास त्याची तात्काळ माहिती पोलिसांना द्या, 

Web Title : marathi news pune railway department is on the hitlist  of antisocial elements 

संबंधित बातम्या

Saam TV Live