जयदत्त क्षीरसागर यांनी घरगुती वादातून राष्ट्रवादी काँग्रेस सोडली - अजित पवार

जयदत्त क्षीरसागर यांनी घरगुती वादातून राष्ट्रवादी काँग्रेस सोडली - अजित पवार

पुणे : जयदत्त क्षीरसागर हे घरगुती वादातून राष्ट्रवादी काँग्रेस सोडत असल्याचे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर हे पक्ष सोडून शिवसेनेत जाणार असल्याबाबत अजित पवार म्हणाले, की जयदत्त यांची नाराजी मागील एक वर्षापासून होती. जयदत्त यांचा घरातील वाद यासाठी कारणीभूत आहे. यातून मार्ग काढावा यासाठी अनेकदा वरिष्ठ पातळीवर प्रयत्न झाले.

विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळणार नाही, तिथं त्यांचा पुतण्या संदीप यांना तिकीट दिलं जाईल, असं त्यांना वाटलं असावं. त्यांना लोकसभा लढवण्याची ऑफर दिली होती. पण त्यांनी ती नाकारली. बीडची जागा युतीत सेनेकडे राहील अशी शक्यता पाहून ते सेनेत गेले असावेत. लोकसभेनंतर मंत्रिपद मिळणार, अशा चर्चा आहेत. एक आमदार गेल्याने पक्षाचं नुकसान होतच, पण अधिक काम करून भर काढू, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

आमच्या लोकसभा निवडणुकीत किती जागा येतील, हे सांगायला मी काही ज्योतिष नाही किंवा पोपटलाही त्याबाबत विचारलेलं नाही,' अशा शब्दांत पवार यांनी निवडणुकीच्या निकालाचा अंदाज व्यक्त करणे अवघड असल्याचे स्पष्ट केले.

गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट हा अंडर करंट कुणालाही कळला नव्हाता. ना भाजपला ना आम्हाला ना मीडियाला. यावेळी काय अंडरकरंट काय ते मला कळलं असता तर.., असे म्हणत अजितदादांनी त्यावर एक्झिट पोलचे अंदाज खरेच ठरतील, असे वाटत नसल्याचे स्पष्ट केले.

भाजपच्या काही उमेदवारांनी निकालाच्या आधीच लाडू तयार करायला घेतलेत, असे निदर्शनास आणून दिल्यानंतर कुणी लाडू तयार करावेत का काय, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण यातून संबंधितांचा अति आत्मविश्वास दिसतोय, असे मत व्यक्त केले.

Web Title: Sandip Kshirsagar may get candidacy thats why Jaydatta Kshirsagar leaves NCP says Pawar
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com