पंतप्रधान मोदी भ्रष्ट, हुकूमशहा : राहुल गांधी

पंतप्रधान मोदी भ्रष्ट, हुकूमशहा : राहुल गांधी

नवी दिल्ली : देशातील प्रत्येकाला माहिती आहे, की कर्नाटकात जे झाले ते लोकशाहीला धरून नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्ट आणि हुकूमशाह आहेत. हे देशातील आपल्या सर्वांना माहिती आहे. ते भ्रष्टाचार पसरवत आहेत, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर केली. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बहुमत चाचणीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली. ते म्हणाले, कर्नाटकात आमदारांना विकत घेण्याचे उघडपणे दिसले. राज्यपाल राष्ट्रगीत सुरु असताना उभे नव्हते. राज्यात जे काही चालले ते तुम्ही पाहिले आहे. भाजप आणि आरएसएसने जे केले ते आता नेहमी तेच करत आहेत. भाजपने जनतेने दिलेल्या कौलचा अपमान केला. विरोधकांनी एकत्र येऊन भाजपला विरोध केला हे चांगले आहे. सर्व एकत्र आले.

ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहांनी काँग्रेस आणि जनेतसाठी खरेदी करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान भ्रष्टाचार वाढवत आहेत. पंतप्रधान भ्रष्टाचारी आहेत. कर्नाटकात तेच झाले. भाजप आणि आरएसएसला आपण रोखू आणि देशाचे रक्षण करणार आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

पंतप्रधान मोदी लोकशाही, देशातील जनतेपक्षा मोठे नाहीत. भाजपकडे कर्नाटकातील जनतेचा पाठिंबा नाही. भाजप लोकशाहीवर सर्वोच्च न्यायालयावर हल्ला करत आहे तेव्हा आम्ही उभे राहू. आम्ही सर्वांनी मिळून भाजपचा पराभव केला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com