अमेठीत राहुल गांधींचा धक्कादायक पराभव

अमेठीत राहुल गांधींचा धक्कादायक पराभव

लोकसभा निकाल 2019 
अमेठी : महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही राहुल गांधीना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दुपारी भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 346 जागांवर आघाडीवर होते; तर कॉंग्रेसप्रणित यूपीएच्या उमेदवारांना केवळ 85 जागांवरच आघाडी मिळविता आली. यामुळे देशात पुन्हा एकदा मोदींचीच सत्ता येणार, यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.

मोदींच्या विजयाची लाट एवढी मोठी होती की, या लाटेतून खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेसुद्धा वाचू शकले नाहीत राहुल गांधी यांचा काँग्रेसचा बालेकिल्ला आणि गड समजल्या जाणाऱ्या उत्तरप्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघातून धक्कादायक पराभव होण्याची शक्यता आहे. अमेठी मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या स्मृती ईराणी यांनी बाजी मारली असून, स्मृती ईराणींनी या मतदारसंघातून 19697 मतांनी आघाडीवर आहेत. अमेठी मतदारसंघात राहुल गांधी यांना 210923 मते मिळाली आहेत तर,  भाजपच्या स्मृती ईराणी यांना 230620 एवढी मते मिळाली आहेत.

दरम्यान, मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची जोडी रोखण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह देशभरातील विरोधकांनी प्रचंड प्रयत्न केले. पण या प्रयत्नांना काहीही यश आलेले दुपारी एकपर्यंतच्या आकडेवारीमध्ये दिसत नाही. 

या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. उत्तर प्रदेशमध्ये मायावती-अखिलेश यादव यांनी परस्पर आघाडी करत कॉंग्रेसला धक्का दिला. त्यानंतर इतर राज्यांमध्येही कॉंग्रेसला आघाडीच्या पातळीवर फारसे यश मिळाले नाही. उमेदवार निवडतानाही कॉंग्रेसने अनेक ठिकाणी चालढकल केली. त्याचाही मोठा फटका पक्षाला बसल्याचे निकालामध्ये दिसत आहे.

Web Title: Rahul Gandhi Losses in amethi against Smriti Irani

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com