राम मंदिराच्या प्रश्नावरुन अयोध्येतलं वातावरण बिघडण्याची शक्यता

राम मंदिराच्या प्रश्नावरुन अयोध्येतलं वातावरण बिघडण्याची शक्यता

राम मंदिराच्या प्रश्नावरुन अयोध्येतलं वातावरण बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 24 आणि 25 नोव्हेंबरला अयोध्येच्या दौऱ्यावर असणारेत. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याला स्थानिक व्यापारी वर्गाकडून विरोध दर्शवण्यात येतोय.

संयुक्त व्यापार मंडळाकडून उद्धव ठाकरे यांना काळे झेंडे दाखवले जाणारेत. अयोध्येत जमावबंदी लागू करण्यात आली असून पोलीस, धडक कृती दल आणि दहशतवादविरोधी पथकं तैनात केली जाणारेत.

उद्धव ठाकरेंच्या  अयोध्या दौऱ्याआधीच राज्यभरातून शिवसैनिक अयोध्येकडे रवाना झालेत. मुंबई, ठाणे, नाशिक अशा विविध ठिकाणाहून शिवसैनिक वेगवेगळ्या ट्रेन्सनं चलो अयोध्याचा नारा देत अयोध्येकडे निघालेत. दरम्यान,  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला  पाठिंबा  देण्यासाठी, पुण्यात आज शिवसैनिकांनी रामआरती  केली. येरवडा  येथील राम  मंदिरात  शेकडो शिवसैनिकांनी  राम  आरती  केल्यानंतर पुणे शहरात बाईक रॅलीसुद्धा काढण्यात आली. 

WebTitle : marathi news ram mandir shivsena uddhav thackeray ayodhya vist tensed situation 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com