रत्नागिरीत शिवसेना-भाजप युतीचे प्रदीप उर्फ बंड्या साळवी विरुद्ध माजी सर्वपक्षीय उमेदवार असा सामना ?

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 मे 2019

रत्नागिरी :  नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी राजिनामा दिल्यानंतर पोटनिवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सेना-भाजप युती असल्यामुळे भाजप वगळता नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीसाठी कुवारबाव पॅटर्न राबविण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. त्यासाठी काहींची नावे देखील चर्चेत आहेत. शिवसेना-भाजप युतीचे प्रदीप उर्फ बंड्या साळवी विरुद्ध माजी सर्वपक्षीय उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर असा सामना रंगण्याची शक्‍यता आहे.

शिवसेनेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी पक्षांतर्गत ठरलेल्या धोरणानुसार सोमवारी  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे राजीनामा दिला. त्यामुळे विधानसभेपूर्वी पोटनिवडणूक होणार हे निश्‍चित झाले आहे. शिवसेनेने यापूर्वीच त्याबाबतची तयारी केली होती. म्हणून राहुल पंडित यांना रजेवर पाठवून बंड्या साळवी यांना प्रभारी नगराध्यक्ष म्हणून 3 महिने संधी दिली. पंडित यांनी राजीनामा दिल्यावर उपनगराध्यक्ष म्हणून पुन्हा साळवी यांच्याकडे नगराध्यक्षपदाचा भार आला आहे. साळवी यांचे प्रतिस्पर्धी कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुदेश मयेकर यांचे नाव होते. मात्र ते विधानसभेसाठी इच्छुक असल्याने त्यांच्याऐवजी माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांचे चिरंजिव केतन शेट्येंचे नाव होते. मात्र, त्यांचेही नाव मागे पडले आहे.

कुवारबाव पॅटर्न नगराध्यक्ष निवडणुकीसाठी राबविण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या पॅटर्नमध्ये शिवसेना वगळता राष्ट्रवादी, कॉंग्रेस, स्वाभिमान पक्ष, मनसे, बविआ आदींचा समावेश होता. या पॅटर्नने सेनेला धक्का दिला. तोच पॅटर्न थेट नगराध्यक्षपदासाठी राबविला जाणार आहे. मिलिंद कीर यांचे उमेदवार म्हणून नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादी, कॉंग्रेस, स्वाभिमान, मनसे आदी पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढणार आहेत. लोकसभा निवडणुकीचा विचार करता शहरातून युतीने 15 हजाराच्या वर मते घेतली होती. तर स्वाभिमानने 9 हजार. त्यामुळे हा पॅटर्न पुढे आला तर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जोरदार चुरस होण्याची शक्‍यता आहे. 

Web Title : 

संबंधित बातम्या

Saam TV Live