केरळ तामिळनाडूमध्ये पावसाचा रेड अलर्ट  

केरळ तामिळनाडूमध्ये पावसाचा रेड अलर्ट  

चेन्नई : मुसळधार पावसामुळे तमिळनाडूतील सर्वच जिल्ह्यांत पुढील दोन दिवसांसाठी 'रेड ऍलर्ट' देण्यात आला आहे. बुधवारी रात्रीपासून पुदुच्चेरी आणि परिसरामध्ये पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली होती. 

या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने आणखी पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने तमिळनाडूत 7 ऑक्‍टोबरपर्यंत 'रेड ऍलर्ट' घोषित करण्यात आला आहे. धोकादायक जागांवर न जाण्याचे आवाहनही प्रशासनातर्फे केले जात आहे. 6 ते 8 ऑक्‍टोबर या कालावधीत मच्छीमारांनाही समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

केरळमध्येही सावधगिरीचा इशारा 
काही दिवसांपूर्वीच पूरस्थितीचा सामना करावा लागलेल्या केरळमध्ये पुन्हा एकदा पाऊस थैमान घालण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे केरळमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. थिसूर आणि पलक्कड येथील धरणांचे दरवाजे काल (गुरुवार) सायंकाळी काही प्रमाणात उघडण्यात आले. शनिवारपर्यंत समुद्रही खवळलेला असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

ऑगस्टमध्ये आलेल्या पुरामुळे केरळमध्ये 493 जणांना जीव गमवावा लागला होता. अनेक जिल्ह्यांमध्ये मालमत्तेचेही प्रचंड नुकसान झाले होते. 

Web Title: marathi news red alert of rain in kerala and tamilnadu 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com