तरूणाईला आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डिजिटल अवतार

तरूणाईला आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डिजिटल अवतार

आपल्या स्थापनेच्या शतकपुर्तीकडे वाटचाल करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता डिजिटल अवतारात समोर आलाय. सरसंघचालक मोहन भागवतांसह संघाचे सात नेते ट्वीटरवर सक्रिय झालेत. यामध्ये सुरेश भैयाजी जोशी, सरकार्यवाह सुरेश सोनी, सह सरकार्यवाह कृष्णा गोपाल, व्ही भागय्या, संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरूण कुमार आणि अखिल भारतीय संपर्क प्रमुख अनिरूद्ध देशपांडे यांचा समावेश आहे. खरं तर मे महिन्यातच मोहन भागवतांचं हे ट्वीटर हँडल तयार करण्यात आलं होतं, मात्र सोमवारपासून ते सक्रिय करण्यात आलंय.
विशेष म्हणजे गेल्याच वर्षी संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर आणि पांचजन्यला दिलेल्या मुलाखतीत भागवतांनी सोशल मीडियाच्या वापरावर टीका केली होती. सोशल मीडिया म्हणजे मी आणि माझं मत यापलिकडे फारसं काही नसतं असं वक्तव्य भागवतांनी केलं होतं. सप्टेंबर १९२५ मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आतापर्यंतची कार्यपद्धती पाहता फार क्वचितच एखादा मोठा बदल संघाने स्विकारलाय. गेल्या वर्षी संघाच्या गणवेशात बदल करतानाही ही बाब समोर आली होती. म्हणूनच संघाच्या प्रमुख नेत्यांचं ट्वीटरवर सक्रिय होणं म्हणजे एक आधुनिक पाऊल मानलं जातंय. 

Web Title: RSS chief Mohan Bhagwat top brass make Twitter debut to check impersonation

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com