राहुल गांधींना दिलासा,अवमान याचिकेप्रकरणी न्यायालयाकडून जामीन मंजूर

राहुल गांधींना दिलासा,अवमान याचिकेप्रकरणी न्यायालयाकडून जामीन मंजूर

वकील धृतिमान जोशी यांनी गांधी यांच्याविरोधात 2017 मध्ये तक्रार केली होती. 
गौरी लंकेश यांची दोन वर्षांपूर्वी बंगळुरातील घरी अनोळखी हल्लेखोरांनी गोळी मारून हत्या केली. त्यानंतर काही तासांत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यात गौरी लंकेश यांच्या हत्येचा संबंध संघाशी जोडला होता, असा आरोप जोशी यांनी तक्रारीत केला आहे.

न्यायालयाने फेब्रुवारी गांधी यांना समन्स बजावण्याचा आदेश दिला होता. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, माकपचे नेते सीताराम येचुरी यांच्या विरोधातही फिर्याद करण्यात आली आहे. गांधी यांच्या विधानामुळे संघाची प्रतिमा मलीन झाली, असा दावा जोशी यांनी केला आहे. 

या प्रकरणी राहुल गांधी आज सकाळी मुंबईत दाखल झाले. त्यानंतर ते शिवडी न्यायालयात पोहचले. सीताराम येचुरीही न्यायालयात उपस्थित केले आहेत. यावेळी त्यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. सुमारे अर्धा तास झालेल्या सुनावणीनंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. राहुल यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांकडून घोषणा देण्यात आला. राहुल गांधी यांनी बुधवारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

Web Title: RSS defamation case Rahul Gandhi reaches Mumbais Mazgaon court

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com