लॅक्मे फॅशन वीक 2018 च्या रॅम्पवर पद्मावत स्टार शाहिद कपूर आणि पत्नी मीरा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

मुंबई - लॅक्मे फॅशन वीक 2018 च्या रॅम्पवर पद्मावत स्टार शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत यांच्या जोडीने सर्वांचे लक्षं वेधून घेतले. शोज् टॉपर म्हणून शाहिद-मीरा यांनी रॅम्प वॉक केला. ऑफ व्हाईट कलरची शाही शेरवानी असा शाहिद आणि ऑफ व्हाईट विथ पीच लाइनिंग फ्लोरल लहंगा असा मीराचा लूक होता.

Morning all!❤️ #mirakapoor #mirarajput

A post shared by Mira Kapoor (@mira_rajput) on

या रॉयल लूक मध्ये एंट्री केलेल्या जोडीला लॅक्मे फॅशन वीकमध्ये खुप वाहवाई मिळाली. रॅम्पच्या मध्यभागी आल्यावर शाहिदने मीराचे बोट पकडून फिरवले तेव्हा तिचा दुपट्टा शाहिदच्या डोक्यावर अडकला. हेच दुसऱ्या बाजूने परत शाहिदने मीराचा हात पकडला तेव्हा ती स्वतःच तिच्या दुपट्ट्यात अडकली. या सर्व गोंधळाने शाहिद-मीरासह प्रेक्षकांनाही हास्य रोखता आले नाही. 

@anitadongre @danielbauermakeupandhair @thehouseofpixels

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on

हा (1 फेब्रु.) लॅक्मे फॅशन वीक 2018चा पहिला दिवस होता. शोज् टॉपर डिझायनर अनिता डोंग्रेसाठी शाहिद-मीराने रॅम्प वॉक केला. शाहिदने यापूर्वी लॅक्मे फॅशन वीकमध्ये वॉक केला आहे. मीराचा हा पहीला लॅक्मे फॅशन वीक वॉक होता.

यावेळी आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये फारच कमी काळात हटके छाप निर्माण केलेली अभिनेत्री तापसी पन्नू हीची बदास अदाही घायाळ करणारी ठरली. डिझायनर रितू कुमार यांनी डिझाइन केलेला ड्रेस तापसीने परिधान केला होता.
 
संबंधित बातम्या