SakalSaamExitPolls : मराठवाड्यात युतीला 05 तर आघाडीला 03 जागा

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 19 मे 2019

एक्झिट पोल 2019 : जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक आज संपली. देशातील सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये आज (रविवार) मतदान झाले आणि याचबरोबर संपूर्ण देशाचा कौल मतदानयंत्रांत बंद झाला. मतदानाची वेळ संपली आणि लगेच एक्झिट पोलचे अंदाज यायला सुरवात झाली. सकाळ आणि सामनेही याबाबत अंदाज दिले आहेत, 

मराठवाड्यात एकूण 08 जागा असून 08पैकी भाजप 03, शिवसेना 02, राष्ट्रवादी 02 तर काँग्रेस 01 जागेवर विजयी होईल असे सांगण्यात आले आहे. म्हणजेच मराठवाड्यातील 05 जागांवर युती तर 03 जागांवर आघाडीचा विजय होईल, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. 2014 च्या लोकसभा निवडुकीमध्ये युतीला 06 तर आघाडीला 02 जागांवर यश मिळाले होते. या निवडणुकीत सकाळ आणि सामच्या सर्वेक्षणांनुसार युतीला एका जागेचे नुकसान होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एकूण जागांपैकी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 03, शिवसेनेला 03 तर काँग्रेसला 02 जागांवर यश मिळाले होते या निवडणुकीत मात्र काँग्रेसला 01 आणि शिवसेनेला 01 जागेचा फटका बसताना दिसत असून राष्ट्रवादीला 02 जागांचा फायदा होणार असल्याचे सकाळ आमि सामच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचा अचूक एक्झिट पोल साम वाहिनी देत असून 
सकाळ आणि साम वाहिनीने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात सर्वाधिक जागा युतीलाच मिळतील, तर आघाडीनेही जोरदार लढत दिल्याचे चित्र आहे. युतीला 29 आणि आघाडीला 19 जागा मिळण्याचा अंदाज साम वाहिनी आणि सकाळच्या एक्झिट पोलने वर्तविला आहे.

Web Title: Sakal Saam Exit poll results of Loksabha Election For Marathwada

संबंधित बातम्या

Saam TV Live