#SangaliFlood : सांगलीत 2005 मध्ये आलेल्या महापूराचा विक्रम यावर्षी मोडणार

#SangaliFlood : सांगलीत 2005 मध्ये आलेल्या महापूराचा विक्रम यावर्षी मोडणार

सांगली : आयर्विन पुलाजवळ आज सकाळी 11 वाजता कृष्णा नदीची पाणीपातळी 50 हून अधिक झाली आहे. नदीचे पाणी उपनगरांमध्ये वेगाने पसरत आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत शहरातील गावभाग मारुती चौक शिवाजी मंडई, टिळक चौक, अमराई चौक, पटेल चौक तसेच मल्टिप्लेक्स जवळच्या परिसरात पुराचे पाणी आले आहे.

महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांचा बंगला ही पुराच्या वेढ्यात अडकला आहे. काल रात्रीपासून नदीच्या पाणी पातळीत अडीच फुटांची वाढ झाली आहे. महापूराची मगरमिठी वाढत चालल्याने पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात काम वेगाने सुरू आहे. गाव भागातील पाणी शिरल्याने सिटी हायस्कूल परिसरातून हजारो लोकांना बाहेर काढले जात आहे. काल रात्रीपासून पूरग्रस्त भागातील चार हजारांवर नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. नंबर 25 आणि शाळा नंबर एक येथे स्थलांतरित केलेल्या पूरग्रस्तांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले आहे. या दोन्ही परिसरात काल रात्री पुराचे पाणी आले.

दरम्यान, कोयना धरणातून एक लाख आठ हजार क्युसेक्स झाल्यावर इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. काल सुरू असलेल्या विसर्गापेक्षा 5000 मे अधिक विसर्ग आजपासून वाढवण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी आज सायंकाळपर्यंत आणखी सुमारे तीन फूट वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सन 2005 मध्ये आलेल्या पुराच्या सर्वोच्च पातळीचा विक्रमही मोडला जाऊ शकतो. 2005 मध्ये आयर्विन पुलाजवळ 53 फुट इतकी सर्वोच्च पाणी पातळी होती ती यंदाच्या पुरात मागे पडेल असे सध्याचे चित्र आहे. दरम्यान एनडीआरएफ याचे पथक सांगलीत दाखल झाले असून वाळवा तालुक्यातील शिरगाव येथे हे त्यांनी बचावाचे कार्य सुरू केला आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील पूरग्रस्त भागात येईल ते बचाव कार्य करणार आहेत.

वाळवा तालुक्‍यात सर्वाधिक फटका
कृष्णा आणि वारणा या दोन नद्या मुळे वाळवा तालुक्‍यात पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथील काही गावे पूर्ण स्थलांतरित करावी लागली आहेत. विशेषता जुने खेड, पर्वत वाडी, मसुचीवाडी बहे, अरणेवाडी या गावांना मोठा फटका बसला असून हजारो लोक स्थलांतरित करण्यात आले आहेत.

Web Title: major flood condition in Sangali

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com