शिवसेना अयोध्येत रामाच्या चरणी सर्व मंत्र्याचे राजीनामे अर्पण करणार काय? - राष्ट्रवादी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

"हर हिंदू की यहीं पुकार... पहले मंदिर फिर सरकार' असा नारा शिवसेनेने अयोध्या दौऱ्यावर जाताना दिला आहे. मात्र, शिवसेनेचा हा नारा केवळ 2019 मध्ये भाजपसोबत युती करण्याचा मार्ग असून, राम मंदिर नसतानाही केंद्र व राज्य सरकार मध्ये सत्तेत असणारी शिवसेना अयोध्येत रामाच्या चरणी सर्व मंत्र्याचे राजीनामे अर्पण करणार काय? असा सवाल कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. 

अयोध्येत राम मंदिर व्हावे, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर निघाले आहेत. मात्र, केंद्र व राज्य सरकारमध्ये सत्तेत असताना "पहले मंदिर. फिर सरकार' ही घोषणा कशासाठी? असा सवाल राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. 

शिवसेना सध्या भाजपसोबत सत्तेत आहे. तरीही भाजपसोबत दररोज संघर्ष सुरू असतो. सध्या राम मंदिरचा विषय शिवसेनेने हाती घेतला असून, भाजपला शह देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live