'आमचे ठरले आहे..त्यामुळे कोणी काहीही बोलू नका,’- उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 9 जून 2019

मुंबई - ‘भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना काहीही विधाने करू द्या, तुम्ही शांत राहा. जागा वाटपाबाबत आमचे ठरले आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलू नका,’ अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांना केल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात जागा वाटपाचे सूत्र ठरले आहे, असे काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. यामुळे शिवसेनेत उलटसुलट चर्चा सुरू झाली असता उद्धव यांनी शिवसेना नेत्यांना आश्‍वस्त केल्याचे समजते. 

अमित शहा यांच्याशी लोकसभा निवडणुकीसाठी युती करतानाच वाटपाबाबत ठरले आहे. तुम्ही चिंता करू नका, अशा प्रकारचा संदेश उद्धव यांनी शिवसेना नेत्यांच्या कानावर घातला असल्याचे शिवसेनेच्या गोटातून समजते.

 

web tittle- Shivsena Uddhav Thackeray Politics


संबंधित बातम्या

Saam TV Live