दुप्पट भाडे देऊनही ‘शिवशाही’ गळक्‍या

दुप्पट भाडे देऊनही ‘शिवशाही’ गळक्‍या

मुंबई - रस्त्यावर गळक्‍या एसटी बस दिसल्यास, संबंधित अधिकाऱ्यांना त्याच बसमधून फिरवणार, अशी तंबी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली होती; मात्र तरीही गळक्‍या एसटी बस अद्यापही रस्त्यावर धावत असून त्यात आता हायटेक खासगी शिवशाही गाड्यांचीही भर पडली आहे. त्यामुळे सातारा-मुंबईच्या अनेक फेऱ्या रद्द करण्याची वेळ एसटी प्रशासनावर आली आहे.

सातारा आगारामध्ये अशा गळक्‍या ‘शिवशाही’ उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. काही बस गळक्‍या अवस्थेतही रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे सातारा-मुंबई मार्गावरील २२ फेऱ्यांपैकी फक्त सात फेऱ्या सुरू असून, राज्यातील इतर आगारांमध्येही अशीच परिस्थिती असल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘शिवशाही’चे दुप्पट भाडे देऊन हायटेक प्रवासाचा लाभ घेण्याचा प्रवाशांचा प्रयत्न असतो; मात्र तीही गळत असल्याच्या अनुभवामुळे ऐन पावसाळ्यात प्रवाशांचे हाल होत आहेत. अनेक ठिकाणच्या शिवशाही गाड्या गळक्‍या असल्याने बंद आहेत; मात्र प्रवाशांच्या मागणीनुसार नादुरुस्त आणि गळक्‍या खासगी शिवशाही रस्त्यावर सोडल्या जात आहेत. राज्यातील अनेक आगारांमध्ये अशी परिस्थिती असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

मुंबईत दैनंदिन प्रवास करणारे सातारा जिल्ह्यातील प्रवासी आहेत. त्यातही शिवशाहीचा प्रवास परवडत नसूनही अनेक वेळा सामान्य प्रवासी ‘शिवशाही’ने प्रवास करण्याचा प्रयत्न करतात; मात्र त्यामध्ये दुप्पट प्रवासभाडे देऊनही सुविधा मिळत नाही. अनेक वेळा गळक्‍या शिवशाहीतूनही प्रवास करावा लागतो.
- गौरव जाधव, प्रवासी

Web Title: Shivshahi bus leakage

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com