आषाढी वारीसाठी यंदा नियोजित फेऱ्यांव्यतिरिक्‍त तीन हजार ७२४ ज्यादा बस

आषाढी वारीसाठी यंदा नियोजित फेऱ्यांव्यतिरिक्‍त तीन हजार ७२४ ज्यादा बस

सोलापूर - श्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या वतीने यंदा नियोजित फेऱ्यांव्यतिरिक्‍त तीन हजार ७२४ ज्यादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली. नव्याने बांधणी केलेल्या माईल्ड स्टीलच्या एक हजार २०० बस त्यात असतील, असेही ते म्हणाले.

आषाढी वारीच्या निमित्ताने दरवर्षी लाखो भाविक पंढरपुरात दाखल होतात. या पार्श्‍वभूमीवर ज्यादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पाच हजार चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. १० जुलै ते १६ जुलै या कालावधीसाठी हे नियोजन असणार आहे. प्रत्येक बसस्थानकावर रुग्णवाहिका, आरोग्य केंद्र व शुद्ध पाण्याची सुविधा करून देण्यात येणार आहे. भाविकांना थेट त्यांच्या गावापासून परिवहनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही रावते यांनी सांगितले.

विभागनिहाय बस
औरंगाबाद    १०९७
पुणे     १०८०
नाशिक     ६९२
अमरावती    ५३३
मुंबई     २१२
नागपूर     ११०

Web Title: Three thousand 724 buses for ashadhi vari

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com