रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपात; सोलापुरात राष्ट्रवादीला खिंडार 

रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपात; सोलापुरात राष्ट्रवादीला खिंडार 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील आज (बुधवार) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची उपस्थिती होती. मोहिते-पाटील घराण्यातून पक्षांतराची ही सातवी फेरी आहे. रणजितसिंहांचे आजोबा दिवंगत शंकरराव मोहिते-पाटील यांच्यापासूनच पक्षांतराची किमया सुरू आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. रणजितसिंह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. त्यानंतर आज त्यांनी भाजपप्रवेश केला. 

अकलूज (ता. माळशिरस) भागाला नंदनवन प्राप्त करून देणारे रणजितसिंह यांचे आजोबा शंकरराव मोहिते-पाटील यांनी 1952 मध्ये स्वतंत्र पक्षाकडून निवडणूक लढवून विजयश्री खेचून आणला होता. त्यानंतर त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करून 1957 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला. पहिल्यापासूनच घरात राजकीय पार्श्वभूमी असलेल्या रणजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

 

WebTitle : marathi news solpaur ranjeet singh mohite patil joins BJP 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com