दहावीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सोशल साईटच्या वापराबाबतचे 'डू'ज्‌ आणि 'डोन्ट'स्‌

दहावीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सोशल साईटच्या वापराबाबतचे 'डू'ज्‌ आणि 'डोन्ट'स्‌

मिरज -  सोळावं वर्ष मागे टाकत सोशल मिडियात प्रवेश करताना नवे अनुभव तरुण घेतो. काही वेळीच सावध होतात; तर काही बिघडतात. इंटरनेटच्या मायाजालात सोशल कट्ट्याच्या निमित्ताने नवे आव्हान पालक, तरुणाईपुढेही आहे. त्यांना धोक्‍याचा इशारा देण्याचे, वेळीच सावध करण्याचे काम "कुमारभारती' ने धड्याद्वारे केले आहे. दहावीच्या इंग्रजीच्या नव्या पुस्तकात सोशल मिडियाबाबत सावध करणारा एक स्वतंत्र धडाच आहे. 

"लाईव्ह इंग्लिश' धड्यात ब्लॉगिंगची माहिती दिली आहे. धड्याच्या शेवटी सोशल साईटच्या वापराबाबतचे "डू'ज्‌ आणि "डोन्ट'स्‌ सांगितलेत.

हे  शिकवतो धडा...

  • सोशल कट्ट्यावर वर्तणूक चांगली ठेवा.
  • तुमची सृजनशीलता आणि चांगली कामगिरी जरुर मांडा.
  • पोस्टस्‌ लोकांना विचार करायला लावणाऱ्या आणि प्रोत्साहीत करणाऱ्या असाव्यात.
  • सक्रिय रहा; पण अती होत नाही ना याचीही काळजी घ्या.
  • स्वच्छ आणि कमी शब्दांत सत्य तेच मांडा.
  • योग्य आणि सुरक्षित साईट निवडा.
  • तुमचे खासगीपण चव्हाट्यावर येणार नाही याची काळजी घ्या.
  • पासवर्ड सांभाळा.
  • तुमच्या पोस्टस्‌ तुमचे व्यक्तीमत्व सांगतात. त्यामुळे किमान "कॉमन सेन्स" पाळा.
  • जुनी नाती सांभाळा. नवीही जोडा.
  • लेखनातील चुका टाळा.
  • टॅगिंग, पोस्टींग आणि शेअरींगपूर्वी दहादा विचार करा.
  • सत्यता, उपयुक्तता आणि इतरांना आनंद या निकषांवर तपासून पहा. 
  •  

काय करु नये 

  • फेक पोस्टींग टाळा.
  • तुमची साईट म्हणजे कचराडेपो नव्हे हे लक्षात असू द्या.
  • सातत्याने पोस्ट टाकण्याने तुम्ही "चीप" होताय हे देखील लक्षात राहू द्या.
  • स्वतःच्याच पोस्टला लाईक करुन हसे करुन घेऊ नका.
  • इतरांच्या पोस्ट दुर्लक्षितही करु नका.
  • सतत पोस्ट करत राहण्याने अनलाईक आणि अनफॉलो व्हाल याचे भान असू द्या.
  • असभ्य भाषा टाळा.
  • सोशल कट्ट्यात बुडून जाणार नाही ना याची काळजी घ्या.
  • सर्वात शेवटचे व महत्वाचे म्हणजे चॅटींग, पोस्टींगमध्ये अडकून अमूल्य वेळ वाया घालवू नका.
  • पालकांच्या डोळ्यांत अंजन घालणारा, सोशल दुनियेचा मेंबर होणाऱ्या नवतरुणांना प्रकाशवाटा दाखवणारा धडा उचित आहे. 

सोशल व्यसनाकडे लक्ष 

आठव्या-दहाव्या वर्षी मोबाईल वापरात पोर बापापेक्षा पुढे जाते. ते आता दहावीच्या पुस्तकात वाचून मोबाईल शिकणार काय ? हा प्रश्‍न निर्माण होतो. "आमचा एवढासा पिंट्या मोबाईल खेळण्यासारखा वापरतो' असा कौतुकाचा सूर ओढणारे पालक काही दिवसांत चिंताग्रस्त होतात. "पिंट्याला व्यसन जडलेय' हे लक्षात येईपर्यंत उशीर झालेला असतो. मोबाईल एक्‍सपर्ट झालेला पिंट्या त्याच्या वापराबाबत किमान आचारसंहीता शिकलाच नाही हे त्यांच्या लक्षात येते. ही जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न कुमारभारतीने केल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com