महिलांना मोफत प्रवास, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा मोठा निर्णय

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 3 जून 2019

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या तयारीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरवात केली असून, केजरीवाल यांनी मोठा निर्णय घेत महिलांसाठी बस आणि मेट्रोमध्ये मोफत प्रवास असल्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या तयारीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरवात केली असून, केजरीवाल यांनी मोठा निर्णय घेत महिलांसाठी बस आणि मेट्रोमध्ये मोफत प्रवास असल्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्लीत 2020 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या तयारी म्हणून आम आदमी पक्षाने (आप) हा मोठा निर्णय घेत महिलांना चक्क मोफत प्रवासाची घोषणा केली आहे. महिलांना प्रभावित करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपला दिल्लीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे दिल्ली विधानसभेत सत्ता असलेल्या आपने हा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील डीटीसी बस आणि मेट्रोमध्ये महिलांना मोफत प्रवास असणार आहे.

अरविंद केजरीवाल म्हणाले, की दिल्ली मेट्रो आणि दिल्ली परिवहन मंडळाच्या बसमध्ये महिलांना मोफत प्रवास देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. याचा बोझा कोणावरही लादण्यात येणार नाही. अनेक महिला आर्थिक समस्येमुळे मेट्रोतून प्रवास करू शकत नाहीत. आता या निर्णयामुळे महिला कोठेही मोफत प्रवास करू शकतील. दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनला याबाबतची भरपाई दिल्ली सरकारकडून दिली जाईल. 

Web Title: state buses and metro may be free for women in Delhi says Arvind Kejriwal


संबंधित बातम्या

Saam TV Live