स्टॅचू ऑफ युनिटीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

स्टॅचू ऑफ युनिटीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

अहमदाबाद : जगातील सर्वांत उंच ठरणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण आज (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. 

अमेरिकेतील प्रख्यात स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यापेक्षा दुप्पट उंचीचा सरदार पटेल यांचा हा पुतळा नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणाजवळील साधू बेटावर उभारण्यात आला आहे. मोदींनी पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर हवाई दलाची तीन विमानांनी तिरंगी ध्वजाच्या रंगांची उधळण करण्यात आले. 

मात्र, या प्रकल्पासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश केल्याचा आरोप करून स्थानिक आदिवासी नेते या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हा पुतळा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' म्हणून ओळखला जात आहे. गुजरातमधील नर्मदा जिल्हास्थित केवडिया येथे 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची उभारणी करण्यात आली आहे. 182 मीटर उंचीचा जगातील हा सर्वांत उंच पुतळा असून, यामुळे देशातील पर्यटन उद्योगाला गती मिळणार आहे. हा पुतळा पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. 

भारताचे पोलादी पुरुष म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांची ख्याती होती. भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रमुख शिल्पकारांपैकी एक असलेल्या वल्लभभाईंचा जन्म गुजरातमधील नाडियाड गावात 1875 मध्ये झाला. पारतंत्र्यातील या काळात देशभक्तीच्या भावनेने जोर धरलेला होता. देशप्रेमाने भारलेले वातावरणात आणि वडील झव्हेरीभाई पटेल यांची प्रेरणा यामुळेच वल्लभभाई स्वातंत्र्यलढ्याकडे ओढले गेले. वडिलांसारखेच ते कणखर, निश्‍चयी, स्पष्टवक्ते होते. अन्यायाविरुद्ध लढण्यास तत्पर असत. याची चुणूक वकिली पेशात दिसली. बार्डोलीच्या सत्याग्रहापासून वल्लभभाईंचे नाव भारतभर गाजले.

WebTitle : marathi news statue of unity inaugurated by pm narendra modi   

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com