राहुल गांधी कोकेनची नशा करतात; सुब्रमण्यम स्वामी यांचे पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य
भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एका वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी थेट राहुल गांधींवर निषाणा साधला आहे. राहुल गांधी कोकेनची नशा करतात. तसेच त्यांची डोपिंग चाचणी केल्यास ते दोषी अढळतील असे त्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी 70 टक्के पंजाबी नशेबाज असल्याचे वक्तव्य केले होते. त्याला दुजोरा देतांना स्वामींनी हे वक्तव्य केले आहे. राजकीय वर्तुळात त्यामुळे चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सरकारी कर्मचाऱ्यांची तसेच पोलिस नियुक्ती आधी डोपिंग चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.