जगाच्या सात आश्‍चर्यांपैकी एक असलेल्या चीनच्या ‘ग्रेट चायना वॉल’नंतर राज्य सरकार बांधणार जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत लांब भिंत

जगाच्या सात आश्‍चर्यांपैकी एक असलेल्या चीनच्या ‘ग्रेट चायना वॉल’नंतर राज्य सरकार बांधणार जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत लांब भिंत

जगाच्या सात आश्‍चर्यांपैकी असलेल्या ‘ग्रेट चायना वॉल’नंतर राज्य सरकार जगातल्या दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत लांब संरक्षक भिंत बांधणार आहे. नागपूर ते मुंबई या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गालगत दोन्ही बाजूने राज्य सरकार तब्बल ७०५ कि.मी.ची भिंत उभारणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. १४१० कि.मी.ची ही भिंत उभी राहिल्यास ते कदाचित जगातील आठवे आश्‍चर्य ठरेल, असे मानले जात आहे.

चीनच्या भिंतीची लांबी ८,८५० कि.मी. आहे. जगातील दुसऱ्या क्रमाकांवर राजस्थानमधील कुंभलगडची संरक्षक भिंत आहे. महाराणा प्रताप यांनी किल्ल्याभोवती ३६ कि.मी.ची ही भिंत उभारली; मात्र समृद्धी महामार्गालगत दुतर्फा ७०५ कि.मी.ची संरक्षक भिंत उभारल्यास ती जगातील दुसऱ्या क्रमांकाची भिंत ठरू शकते.

मुनगंटीवार यांनी मंगळवारी मंत्रालयात याबाबत माहिती दिली. जगभरात द्रुतगती महामार्गालगत अशी संरक्षक भिंत बांधण्याची पद्धत लोकप्रिय आहे, असा दावा मुनगंटीवार यांनी केला. या भिंतीमुळे महामार्गावरील वाहतुकीतील अडथळे दूर होतील, अपघात टाळले जातील. या महामार्गावरून द्रुतगतीने वाहने जाणार असल्याने रिकाम्या परिसरातील जनावरांचाही उपद्रव टळेल. या महामार्गावर अनेक शहरे उभारण्यात येणार आहेत. त्यातून जोडल्या जाणाऱ्या वाहतुकीमुळे अपघातांची शक्‍यता आहे. संरक्षक भिंतीमुळे या दुर्घटना रोखता येणे शक्‍य आहेत, असा दावाही मुनगंटीवार यांनी केला. दरम्यान, या महामार्गावर व्यावसायिक क्षेत्रे उभारली जाणार आहेत. तेथील सरकारी जमिनीवरील अतिक्रमणेही या भिंतीमुळे रोखता येतील, असेही ते म्हणाले. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com