गेल्या पाच वर्षांत देशात "सुपर इमर्जन्सी'- ममता

गेल्या पाच वर्षांत देशात "सुपर इमर्जन्सी'- ममता

कोलकता : आणीबाणीचा आज स्मरण दिन आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत देशात "सुपर इमर्जन्सी' लागू आहे, अशी टीका पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्‌विटरवर केली आहे. ट्विट करताना म्हटले की, गेल्या पाच वर्षांत भारतात आणीबाणीसदृश्‍य स्थिती आहे. आपण इतिहासाकडून काहीतरी शिकले पाहिजे. लोकशाहीचे रक्षण करण्याबरोबरच लढाईही सुरू ठेवली पाहिजे.

25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. ही आणीबाणी दोन वर्षांपर्यंत लागू होती. या दरम्यान सरकारविरुद्ध आवाज उठविणाऱ्याला तुरुंगात टाकले जात होते. प्रेसवरही अनेक प्रकारचे निर्बंध लागू केले होते. याबाबत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा आणीबाणीवरून कॉंग्रेसला लक्ष्य केले आहे.

दुसरीकडे आणीबाणी स्मरण दिनानिमित्ताने ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून मोदी सरकार आणि ममता बॅनर्जी यांच्यात अनेक पातळीवर संघर्ष झाला आहे. अशा स्थितीत ममता यांनी पुन्हा निशाणा साधला आहे. 

पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे काम पाहता, ते आणीबाणीपेक्षा कमी नाही. राज्याच्या कारभार त्या अतिशय वाईट पद्धतीने हाताळत आहेत. भाजपचा लोकशाहीवर विश्‍वास असून, त्याचे संरक्षण करण्यास बांधील आहे. 

- प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री

Web Title: Super Emergency in country from Last Five Years says mamta banerjee

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com