इस्त्रोकडून स्वदेशी नॅविगेशन उपग्रह IRNSS-1I चं यशस्वी प्रक्षेपण..

इस्त्रोकडून स्वदेशी नॅविगेशन उपग्रह IRNSS-1I चं यशस्वी प्रक्षेपण..

चेन्नई : भारताचा दूरसंवेदन उपग्रह 'आयआरएनएसएस-1आय' या उपग्रहाचे आज (गुरुवार) पहाटे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. इस्त्रोकडून आज पहाटे चार वाजून चार मिनिटांनी हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. हा 1425 किलोग्रॅमचा उपग्रह पीएसएलव्ही-सी41 या प्रक्षेपकाद्वारे अवकाशात सोडण्यात आला. श्रीहरिकोटा येथून सोडण्यात येणार असणाऱ्या या उपग्रहाचे आयुष्यमान दहा वर्षांचे आहे. दिशादर्शक उपग्रहांच्या मालिकेतील हा नववा उपग्रह आहे. 'आयआरएनएसएस-1ए' या उपग्रहाची जागा नवा उपग्रह घेईल. 'आयआरएनएसएस-1ए' उपग्रहातील आण्विक घड्याळ बिघडले आहे. इस्त्रोचे प्रमुख के. सिवान यांनी या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com