13 जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक टी-1 वाघिणीला वनविभागाच्या रेस्क्यू टीमने केलं ठार

13 जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक टी-1 वाघिणीला वनविभागाच्या रेस्क्यू टीमने केलं ठार

गेल्या दीड महिन्यांपासून वनविभागाच्या शोध पथकाला गुंगारा देणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आलं आहे. टी-1 वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या 47 दिवसांपासून वनविभागाचे प्रयत्न सुरू होते. अखेर शुक्रवारी रात्री वन विभागाच्या रेस्क्यू टीमनं तिला ठार केलं. तिने आतापर्यंत 13 ग्रामस्थांचा बळी घेतला होता. राळेगावच्या जंगलात वनविभागाच्या ट्रॅपमध्ये सापडलेल्या टी1 वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्या वाघिणीने टीमवरच हल्ला करण्यासाठी चाल केल्याने शुटर असगर अलीने त्या नरभक्षक वाघिणीला गोळ्या घातल्या. पाच शार्प शुटर, तीन मोठे पिंजरे, 500 वन कर्मचारी आणि खासगी कर्मचाऱ्यांची फौज या ठिकाणी होती. लोणी, सराटी, खैरगाव, विहिरगाव, येडशी, मिरा, तेजनी या गावांमध्येही वाघिणीची चांगलीच दहशत होती. आता तिला ठार करण्यात आल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मृत टी1 वाघिणीचं शवविच्छेदन नागपूरमध्ये करण्यात येणार आहे.

यवतमाळकरांनी टाकला सुटकेचा निश्वास
यवतमाळमध्ये टी - 1 वाघिणीला ठार करण्यात आल्यानंतर यवतमाळकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. यानंतर यवतमाळकरांनी फटाके वाजवून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला. या नरभक्षक वाघिणीनं तब्बल 13 जणांचा बळी घेतला होता. यामुळे या भागात दहशतीचं वातावरण होतं. गेल्या 2 महिन्यांपासून तिचा शोध सुरू होता. अखेर तिला ठार करण्यात वन विभागाला यश आलं आणि यवतमाळकरांनी सेलेब्रेशन केलं.

WebTitle : marathi news t1 tigeress killed by rescue team in yawatmal 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com