तळोजा MIDCतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मोठा स्फोट

तळोजा MIDCतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मोठा स्फोट

तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. केमिकलच्या ड्रमला जेसीबीचे फावडे लागल्याने भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी खड्डा खणताना ही घटना घडली आहे. यामध्ये जेसीबी चालवणारे दोन कामगार जखमी झाले आहेत. स्फोटाची माहिती मिळताच शीळ डायघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

अग्निशमन दलदेखील घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान, हा स्फोट इतका भीषण होता की, यामुळे कल्याणजवळच्या 14 गावांना भूकंपसदृश्य हादरे बसले आहेत. 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com