तमीळ सुपरस्टार धनुश याचा 'हा' हॉलीवूडचा चित्रपट भारतातदेखील होणार प्रदर्शित

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 मे 2019

तमीळ सुपरस्टार धनुश त्याच्या "मारी', "मारी 2' सारख्या अनेक तमीळ चित्रपटात दिसला. बॉलीवूडमध्ये तो "रांझना', "शमीताभ'सारख्या चित्रपटात दिसला. त्यानंतर त्याला खरी प्रसिद्धी मिळाली "व्हाय दिस कोलावरी डी' या गाण्यामुळे. अनेक सुपरहिट चित्रपटात काम केल्यानंतर त्याने "द एक्‍स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर' या हॉलीवूड चित्रपटात काम केले. हा चित्रपट हॉलीवूडमध्ये 2018 ला प्रदर्शित करण्यात आला होता. आता हा चित्रपट भारतातदेखील प्रदर्शित होणार आहे.

21 जून रोजी हा चित्रपट भारतात इंग्रजी आणि तमीळ भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे इंडियन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटात धनुश एका जादूगाराची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन केन स्कॉट यांनी केले आहे. धनुशच्या चाहत्यांना त्याच्या या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. 

Web Title: Actor Dahnush s The extraordinary journey of Fakir movie will be release in India

संबंधित बातम्या

Saam TV Live