केरळमध्ये घडले माणुसकीचे दर्शन; नमाज पठणासाठी उघडले मंदिराचे दरवाजे

केरळमध्ये घडले माणुसकीचे दर्शन; नमाज पठणासाठी उघडले मंदिराचे दरवाजे

पुराने वेढलेल्या केरळमध्ये अनेक ठिकाणी माणुसकीचे दर्शन पहायला मिळत आहे. बुधवारी बकरी ईदच्या दिवशी पुराच्या पाण्यात मशीद बुडाली गेल्यानंतर चक्क मुस्लिम नागरिकांसाठी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
केरळमध्ये बकरी ईदच्या निमित्ताने धार्मिक एकतेचे एक उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. त्रिशूर जिल्ह्यातील माला शहराजवळील ईरावतूरमध्ये पुरुपिलिकव रक्तेश्वरी मंदिराच्या अधिकाऱ्यांनी मंदिराचा एक हॉल बकरी ईदच्या नमाज पठणासाठी उघडला. कारण, कोचुकाडव महल मशिदीसह अनेक मशिदी पुराच्या पाण्यामध्ये बुडाल्या होत्या. त्यावेळी मंदिराचा दरवाजा उघडून एक हॉल नमाज पठणासाठी देण्यात आला.

याबाबत बोलताना या परिसरातील बचाव कार्यामध्ये सहभागी झालेला अभिनव म्हणाला, मंदिराच्या हॉलमध्ये आधीपासूनच अनेक जणांनी आसरा घेतला होता. तेव्हा मुस्लिम बांधवांना नमाज पठणासाठी जागा उपलब्ध नसल्याचे आमच्या लक्षात आले. त्यामुळे काही हिंदू तरुणांनी पुढाकार घेतला आणि मंदिराच्या हॉलमध्ये नमाज पठण करण्याची परवानगी दिली.

त्यानंतर नागरिकांनी आजूबाजूच्या घरांमधून चटया गोळा केल्या आणि इतर व्यवस्थाही केली आणि जवळपास 300 जणांनी मंदिराच्या हॉलमध्ये नमाज पठण केले.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com