विरोधी पक्षनेतेपदासाठी 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा

विरोधी पक्षनेतेपदासाठी 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा

नवी मुंबई : काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाईल, हे आता सांगता येणार नाही. विखे गेल्यावर काँग्रेस आमदारांची संख्या किती राहील, त्यावरून पुढील निर्णय घेण्यात येईल. सर्वात जास्त सदस्य कुणाचे राहतील यावरही याबाबतची गणितं ठरणार आहेत, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडेही जाऊ शकते, याबाबतचे संकते दिले आहेत. 

विरोधीपक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रसकडे गेले तर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या सुरु आहे. तर काँग्रेसने हे पद राखल्यास स्वतः पृथ्वीराज चव्हाण हे पद आपल्याकडे ठेऊ शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही विरोधी पक्षनतेपदाची जबाबदारी दिल्यास आपण ती स्वीकारू असे म्हटले होते. म्हणून, त्यांचेही नाव सध्या चर्चेत आहे. 

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांनी विखे पाटलांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा स्वीकारला आहे, अशी माहिती दिली. त्यामुळे विखे आता 27 तारखेला काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. नगरचे मतदान पार पडल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात दाखल झाले आहे. गावी गावी ते समर्थकांच्या बैठका घेत आहेत. विखे पाटील हाच आमचा पक्ष असून ते जो आदेश देतील त्यानुसार काम करण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

WebTitle : MARATHI NEWS THESE ARE POTENTIAL CANDIDATES FOR THE POSITION OF OPPOSITION LEADER

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com