चिमुरड्या दिव्यांशचं काय झालं? कुठे हरवला दिव्यांश?

चिमुरड्या दिव्यांशचं काय झालं? कुठे हरवला दिव्यांश?

मुंबईत गोरेगावमध्ये अवघ्या अडीच वर्षांचा दिव्यांश नावाचा चिमुरडा गटारात वाहून गेलाय. गोरेगावच्या आंबेडकरनगर परिसरात राहणारा हा मुलगा रात्री उशिरा घराबाहेर पडला होता. खेळता खेळता तो गटारात वाहून गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. 

दिव्यांश वाहून गेल्याचं कळल्यानंतर फायरब्रिगेडनं सर्च ऑपरेशन राबवलं. जेसीबीच्या मदतीनं गटार फोडलं. मात्र दिव्यांशचा काही थांगपत्ता लागला नाही. दिव्यांशच्या कुटुंबीयांवर तर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या सर्व प्रकाराला मुंबई महापालिका जबाबदार असल्याचा आरोप आता स्थानिक करत आहेत..

दोनच वर्षांपूर्वी डॉ. दीपक अमरापूरकर यांचा परळ भागात मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. तरीही अशा प्रकारच्या घटना मुंबईत सुरूच आहेत. मात्र, महापालिकेकडून नेहमीची थातूरमातूर उत्तरं दिली जातायत.

गेल्या पाच वर्षांची आकडेवारी तपासली तर मुंबई शहरात मॅनहोल, गटार किंवा समुद्रात पडण्याच्या 639 घटना घडल्यात. त्यात 328 जणांचा मृत्यू झालाय. ही आकडेवारीच सांगते की मॅनहोल, उघड्या गटारांकडे महापालिका किती गांभीर्यानं लक्ष देते ते. नाहीतर दिव्यांशसारखा चिमुरडा या गटारात वाहून जाण्याचं काहीच कारण नव्हतं. किमान आतातरी महापालिकेला जाग येईल आणि उघडी गटारं, मॅनहोल जीवघेणे ठरू नयेत, यासाठी उपाययोजना केल्या जातील, अशी भाबडी अपेक्षा करायला हरकत नाही.

WebTitle : marathi news tow and half year old divyans drown in gutters of mumbai 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com