आजपासून राज्यातील व्यावसायिक वाहतूकदारही संपावर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 20 जुलै 2018

दूध उत्पादक शेतकऱ्यांचा संप संपुष्टात येताच आजपासून राज्यातील व्यावसायिक वाहतूकदारही संपावर जाणारेत. ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या हाकेवर महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर वाहतूकदार महासंघाने हा संप पुकारला आहे.

आजपासून देशव्यापी बेमुदत चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील ट्रक चालक, मालक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिकही सहभागी होणार आहेत.

दरम्यान, हे चक्का जाम आंदोलन झाल्यास जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live