आरक्षणासाठी जीव देणारे जीवही घेतील.. - उदयन राजे

आरक्षणासाठी जीव देणारे जीवही घेतील.. -  उदयन राजे

पुणे : ''आरक्षणाबाबत निर्णय होईल. मात्र, यासाठी आत्महत्या आणि तोडफोड यांसारखे प्रकार व्हायला नको. सोयींच्या राजकारणामुळे अनेक बळी गेले आहेत. लोकांनी रस्त्यावर यायला सरकार जबाबदार आहे. आरक्षणाबाबत सरकारचा वेळकाढूपणा आहे'', अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. तसेच आरक्षणासाठी जीव देणारे जीवही घेतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे : 

- आरक्षणासाठी जीव देणारे जीवही घेतील. 

- ताबडतोब निर्णय घ्या. नाहीतर उद्रेक होईल. आंदोलक मंडळी तुमच्यावर तुटून पडेल. त्यामुळे यावर निर्णय घ्या. 

- आरक्षणाच्या मुद्यावर इतकी चर्चा का ? मी पेटवापेटवीचे काम करत नाही. 

- वेळीच आरक्षण दिले असते. तर आयोगाची गरज निर्माण झाली नसती.

- नाहीतर नाही हे तरी सांगा. मग पाहू काय करायचे ते... काहीतरी सांगा. देणार असेल तर देतो म्हणून सांगा.

- उद्रेक होता तेव्हा कोणीही काही बघणार नाही. मग तो उदयनराजे असो की आणखी कोणी ?

- लोकांनी तुम्हाला निवडून दिले, त्यामुळे त्यांना तुमच्याकडून अपेक्षा आहे.

- कायदा हातात घेतल्यानंतर त्याला तुम्हीच जबाबदार

- हाताबाहेर परिस्थिती गेल्यानंतर कोणीही ऐकून घेणार नाही.

- आरक्षणावर सरकार किती मौन बाळगणार ?

- महाराष्ट्रातील 82 टक्के शेतकरी मराठा आहे.

- मराठा आंदोलकांना नक्षलवादी होण्याची वेळ येऊ देऊ नका.

- लोकं आता ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये राहिलेले नाहीत.

- 30 वर्षे झाली मात्र, यावर काही झाले नाही. त्यामुळे पुढे काय झाले तर पुढे पाहा.

- प्रत्येक ठिकाणी जात आणली जात नाही.

- असे असते तर अजूनही आपण भारताच्या गुलामगिरीत वावरलो असतो. 

- लोकशाहीत तुम्ही लोकं राजे आहात.

- चर्चा करायची गरज नाही, टक्केवारीची चर्चा करणार का टक्केवारीच्या चर्चेत मी कधी नसतो.

- आत्महत्या थांबल्या गेल्या पाहिजे. यात वाढ व्हायला नको.

- राज्यकर्त्यांनी प्रशासनाने याकडे पाहिले पाहिजे. असा उद्रेक होणार नाही.

- सर्वांनी एकत्र बसून यावर मार्ग काढला पाहिजे.

- आरक्षण मी एकटा देऊ शकत नाही. लोकशाहीतील तीन स्तंभांनी याकडे मार्ग काढला पाहिजे.

-  9 तारखेला जे करायचं ते शांततेथ करा. कुणाची ही मानहानी करू नका.

- माझी विनंती आहे, सगळ्या आमदार आणि खासदारांना की आरक्षणाच्या प्रश्नावर ताबडतोब मार्ग काढा

- हाताबाहेर परिस्थिती जाऊ देऊ नका.

- हात जोडून विनंती की यावर मार्ग काढा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com