Loksabha 2019 : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या कणकवलीत प्रचार सभा

Loksabha 2019 : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या कणकवलीत प्रचार सभा

कणकवली - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी (ता. १८) कणकवलीत प्रचार सभा घेणार आहेत. उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणात सायंकाळी पाच वाजता ही सभा होईल. 

या सभेत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.  

श्री. राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी कोकण दौऱ्यावर आहेत.  सकाळी अकराला देवरूखमध्ये त्यांची सभा होईल. तर सायंकाळी पाच वाजता संकरित सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी शिवसेनेकडून सुरू करण्यात आली आहे. 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्यातील राजकीय संघर्ष पाहता ते कणकवलीच्या सभेत काय बोलणार याची उत्सुकता मतदारांना आहे.

Web Title: marathi news uddhav thackeray sabha in kalkavali 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com