मुख्यमंत्री-उदयनराजेंमध्ये बंद दाराआड चर्चा; उदयनराजे भाजप नेत्यांच्या संपर्कात ?
राष्ट्रपतीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप मंत्र्यांच्या भेटीचा धडाका लावलाय. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाममंत्री अशा महत्त्वपूर्ण भाजप नेत्यांच्या भेटी उदयनराजेंनी घेतल्या. इतक्यावरच उदयनराजे थांबले नाहीत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उदयनराजेंनी भेट घेतली.
या भेटीत बंद दाराआड चर्चा झाली. मतदारसंघातील कामांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेत असल्याचं उदयनराजेंनी स्पष्ट केलंय.

इतर पक्षातही आपले मित्र असल्याचं सूचक विधान उदयनराजेंनी यापूर्वीच केलंय. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उदयनराजेंना उमेदवारी देण्यास विरोध केल्याची चर्चा आहे. ही सारी परिस्थिती पाहता उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांसह भाजप मंत्र्यांच्या घेतलेल्या भेटी खूप काही सांगून जातात.